Mohammed Siraj : आरसीबीची पोरं भांडखोरच! सामन्यात पुन्हा गदारोळ, सिराजच्या कृतीने मैदानात उडाली खळबळ

बंगळुरूच्या शेवटच्या सामन्यात मैदानावर चांगलाच गदारोळ झाला होता आता पण...
Mohammed Siraj : आरसीबीची पोरं भांडखोरच! सामन्यात पुन्हा गदारोळ, सिराजच्या कृतीने मैदानात उडाली खळबळ

Mohammed Siraj vs Phil Salt IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या शेवटच्या सामन्यात मैदानावर चांगलाच गदारोळ झाला होता. संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर गौतम गंभीरसोबत भांडण झाले होते. काल आरसीबीचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेला. या सामन्यातही गदारोळ झाला. यावेळी आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फिल सॉल्ट यांच्यात लढत झाली.

Mohammed Siraj : आरसीबीची पोरं भांडखोरच! सामन्यात पुन्हा गदारोळ, सिराजच्या कृतीने मैदानात उडाली खळबळ
Virat Kohli Sourav Ganguly : दादा दादाच असतो! 'पराभूत' विराटचं हस्तांदोलन करत सांत्वन?

आयपीएल 2023 च्या 50 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ दिल्ली कॅपिटल्ससमोर होता. या सामन्यात दिल्ली संघाने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 4 गडी गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघाने अवघ्या 16.3 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला.

आरसीबीच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या उभारली पण पहिल्याच षटकापासून त्यांच्या गोलंदाजांना फटका बसू लागला. त्यामुळेच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला या गोष्टीचा राग आला आणि त्याने दिल्लीचा सलामीवीर फिल सॉल्टशी भिडला.

Mohammed Siraj : आरसीबीची पोरं भांडखोरच! सामन्यात पुन्हा गदारोळ, सिराजच्या कृतीने मैदानात उडाली खळबळ
DC vs RCB : विराटचे विक्रमी तर महिपालचे पहिले वहिले अर्धशतक, आरसीबीने दिल्लीसमोर ठेवले मोठे आव्हान

मोहम्मद सिराज आयपीएल 2023 मध्ये चांगली गोलंदाजी करत आहे. पॉवरप्लेमध्ये त्याच्याविरुद्ध धावा काढणे खूप अवघड असते. पण दिल्लीच्या डावाच्या पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने 10 धावा दिल्या. यानंतर त्याने 5 वे षटक टाकले. सॉल्टने ओव्हरच्या पहिल्या तीन चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. यानंतर सिराजने बाऊन्सर मारला. पण चेंडू डोक्यावरून चांगला गेला, म्हणून अंपायरने त्याला वाईड म्हटले. यानंतर सिराज फिल सॉल्टकडे गेला आणि काहीतरी म्हणाला

दोघांमध्ये वाद सुरू झाला. संतापलेल्या सिराजनेही बोट दाखवले. पंच आणि दुसऱ्या टोकाला फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने मध्यभागी बचाव केला. यादरम्यान सिराजने तोंडावर बोट ठेवून शांत राहण्यास सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com