IPL 2023: RCBच्या पराभवाने बदलले प्लेऑफचे समीकरण, विराटच्या संघाकडे आता पात्र होण्यासाठी काय आहे मार्ग?

दिल्लीच्या आरसीबीविरुद्धच्या विजयाने गुणतालिकेत निर्माण झाली नवी समीकरणे
rcb playoffs chances qualification scenario in ipl 2023
rcb playoffs chances qualification scenario in ipl 2023

IPL 2023 Playoffs qualification Scenario : दिल्ली कॅपिटल्सने आरसीबी संघाचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. आयपीएल 2023 मध्ये जवळपास अर्धा हंगाम संपला आहे आणि सर्व संघ प्लेऑफमध्ये जाण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. दिल्लीच्या आरसीबीविरुद्धच्या विजयाने गुणतालिकेत नवी समीकरणे निर्माण झाली आहेत.

rcb playoffs chances qualification scenario in ipl 2023
CSK vs MI : मुंबई इंडियन्सला 'या' खेळाडूची भासली उणीव! पराभवानंतर कर्णधार रोहितने याला धरले जबाबदार

आरसीबीसाठी हे आहे समीकरण

आयपीएल 2023 मध्ये आरसीबी संघाने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 5 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. त्याच्याकडे 10 गुण आहेत आणि रेट रन रेट 0.209 आहे. गुणतालिकेत तो पाचव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला उर्वरित चारपैकी तीन सामने जिंकावे लागतील. त्यामुळे 16 गुण मिळतील. याशिवाय त्याला इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागू शकते.

rcb playoffs chances qualification scenario in ipl 2023
Mohammed Siraj : आरसीबीची पोरं भांडखोरच! सामन्यात पुन्हा गदारोळ, सिराजच्या कृतीने मैदानात उडाली खळबळ

आरसीबी विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघ शेवटच्या स्थानावर होता, परंतु या विजयासह दिल्लीचे 2 गुण झाले आणि तो गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दिल्लीने 10 पैकी 4 सामने जिंकले असून 6 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्याचा रेट रन रेट -0.529 आहे. त्याचे अजून चार सामने बाकी आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 8 व्या क्रमांकावर आहे, परंतु त्याचा धावगती दिल्लीपेक्षा चांगला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल 2023 मध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. संघाला 9 पैकी केवळ 3 सामने जिंकता आले असून त्यांचे 0.540 गुण आहेत. गुणतालिकेत तो शेवटच्या स्थानावर आहे.

rcb playoffs chances qualification scenario in ipl 2023
Virat Kohli Sourav Ganguly : दादा दादाच असतो! 'पराभूत' विराटचं हस्तांदोलन करत सांत्वन?

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हा संघ 14 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्ज 13 गुणांसह दुसऱ्या, लखनऊ सुपर जायंट्स 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे संघ अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. गुजरात आणि सीएसकेचा संघ प्लेऑफमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com