World Cup : सलग तिसऱ्या पराभवानंतर पाकिस्तान वर्ल्ड कपमधून जाणार बाहेर? अफगाणिस्तान अजूनही शर्यतीत

World Cup Points Table After AFG Vs ENG Match
World Cup Points Table After AFG Vs ENG Matchsakal

ICC World Cup 2023 Points Table : वर्ल्ड कप 2023 च्या 22 व्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव करत इतिहास रचला. या संघाने प्रथमच एकाच वर्ल्ड कप दोन सामने जिंकले आहेत. यापूर्वी त्यांनी याच इंग्लंडचा पराभव केला होता. पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यानंतर गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले दिसत आहे. सलग तिसऱ्या पराभवानंतर पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सध्याच्या गुणतालिकेत भारताने पाच सामन्यांत पाच विजय मिळवले आहेत आणि 10 गुण आहेत, तर नेट रन रेट +1.353 आहे. न्यूझीलंडचा संघ पाच सामन्यांत चार विजय आणि आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचा नेट रन रेट +1.481 आहे. 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. त्याने नऊपैकी सात सामने जिंकले. एकात पराभवाला सामोरे जावे लागले तर एक सामना अनिर्णित राहिला होता.

दक्षिण आफ्रिकेने चार सामन्यांत तीन विजय आणि एक पराभवासह सहा गुण झाले असून संघ तिसऱ्या स्थानावर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा नेट रन रेट, जो +2.212 वर सर्वाधिक आहे.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाने यापूर्वी श्रीलंकेचा पराभव करून नवव्या क्रमांकावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली होती. यानंतर पाकिस्तानचा पराभव करून संघ सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला. त्याचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा चांगला झाला आहे. ऑस्ट्रेलियाने चार सामने खेळले असून दोघांचे दोन विजय, दोन पराभवांसह चार गुण आहेत.

ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट -0.193. त्याचबरोबर अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा नेट रन रेट -0.400 झाला आहे. त्याने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत.

मात्र, पाकिस्तानचा संघ अजूनही पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानवर विजय मिळवण्यापूर्वी अफगाणिस्तानचा संघ शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर होता. विजयानंतर संघाने मोठी झेप घेत सहाव्या स्थानावर पोहोचले. पाच सामन्यांतून दोन विजय आणि तीन पराभवांसह चार गुण आहेत. मात्र, नेट रन रेटमध्ये हा संघ पाकिस्तानच्या मागे आहे.

अफगाणिस्तानचा नेट रन रेट -0.969 आहे. अफगाणिस्तान संघाने आगामी सामन्यांमध्ये अपसेट निर्माण करत राहिल्यास हा संघ इतिहास रचून उपांत्य फेरीत धडक मारू शकतो. त्याचबरोबर पाकिस्तानचे न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या मोठ्या संघांविरुद्ध आता सामने आहेत, त्यामुळे वर्ल्ड कपमधून बाहेर जाण्याचा धोका आहे.

बांगलादेशचे चार सामन्यांतून दोन गुण आहेत, तो सातव्या स्थानावर घसरला. बांगलादेशी संघ मंगळवारी दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. हा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेतही मोठा फरक निर्माण करेल. नेदरलँड एक विजय आणि तीन पराभवांसह आठव्या स्थानावर आहे तर श्रीलंका एक विजय आणि चार पराभवांसह नवव्या स्थानावर आहे. गतविजेता इंग्लिश संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानावर आहे. चार सामन्यांतून एक विजय आणि तीन पराभवांसह दोन गुण आहेत. इंग्लंडचा नेट रन रेट -1.248 आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com