WTC : अश्विनला विश्वविक्रमाची संधी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

R ashwin

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह मायदेशात इंग्लंडविरुद्ध अश्विनने प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे.

WTC : अश्विनला विश्वविक्रमाची संधी!

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंडमधील साउथहॅम्टनच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (ICC World Test Championship Final) रंगणार आहे. 18 ते 22 जून या पाच दिवसांतील खेळानंतर (दोन्ही संघातील ताकद पाहता निकाल पाच दिवसानंतर लागेल ही अपेक्षा) आयसीसीच्या पहिल्या वहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपवर कोण नाव कोरणार याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागून आहे. फायनल सामन्यात रविचंद्रन अश्विनकडून (R Ashwin) अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह मायदेशात इंग्लंडविरुद्ध अश्विनने प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. अशीच कामगिरी त्याने फायनलमध्ये करावी, अशी तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा असेल. (icc world test championship final list of leading wickettakers of test-championship ashwin Chance to Set Record)

हेही वाचा: चहल म्हणाला, या दोघांमुळे कुलदीप सोबतची साथ तुटली!

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलमध्ये एक खास रेकॉर्डही आर अश्विनच्या नावे होऊ शकतो. आतापर्यंत या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम हा ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सच्या नावे आहे. कमिन्सने सर्वाधिक 70 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत इंग्लंडचा स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 69 विकेट्स आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून आउट झाल्यानंतर आता अश्विन त्यांना ओव्हरटेक करुन पुढे जाऊ शकतो.

हेही वाचा: द्रविड कोच होताच पाकिस्तानमधून उमटली अशी प्रतिक्रिया

रविचंद्रन अश्विने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 67 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे अवघ्या चार विकेट घेऊन तो पॅट कमिन्सला मागे टाकून अव्वलस्थान मिळवू शकतो. या यादीत ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायन 56 विकेटसह चौथ्या क्रमांकावर असून भारतीय संघाविरुद्ध न्यूझीलंडचे प्रमुख अस्त्र असलेल्या टीम साऊदी 51 विकेटसह पाचव्या स्थानावर आहे. साउदी फायनल खेळला तरी त्याला शेवटच्या सामन्यात 19 विकेट्स मिळवून पॅट कमिन्सची बरोबरी करता येणार नाही. त्यामुळे तो गोलंदाजीत आपले स्थान सुधारू शकतो. पण अव्वल बनण्याची संधी ही केवळ अश्विनलाच असेल.

loading image
go to top