WTC : शास्त्री गुरुजींनी 3 गोष्टींवर आखलाय गेम प्लॅन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ravi shastri

WTC : शास्त्री गुरुजींनी 3 गोष्टींवर आखलाय गेम प्लॅन

sakal_logo
By
सुशांत जाधव

ICC World Test Championship Final : इंग्लंडमधील साउथम्प्टनच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनल रंगणार आहे. टेस्टमधील पहिल्या-वहिल्या बेस्ट फायनलसाठी दोन्ही संघातील खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांमध्येही कमालीचा उत्साह दिसून येतोय.

18 ते 22 जून दरम्यान साउथम्प्टनच्या द रोझ बाऊल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील फायनल सामन्यात दमदार कामगिरी करण्यासाठी मुख्य कोच रवी शास्त्री फलंदाजांच्या कामगिरी सुधारण्यासाठी मेहनत घेत आहेत. 3 गोष्टींच्या माध्यमातून फलंदाजी मजबूत करण्याचा प्लॅन शास्त्रींनी आखला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहीलने 13 डावापूर्वी शतक झळकावले आहे. युवा सलामीवीर शुभमन गिल कसोटीतील आपल्या पहिल्या शतकाच्या प्रतिक्षेत आहे. उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनं 50 डावात केवळ 3 शतके झळकावली आहेत. रोहित शर्मा वगळता सर्वच आघाडीचे फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे फलंदाजीवर अधिक भर दिला जात आहे.

हेही वाचा: एका रात्रीतल्या श्रीमंतीनं गडबडून गेलेला खेळाडू

  • फायनल जिंकण्यासाठी फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी खास ट्रिक्स वापरण्यात येणार आहे. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे पिचचे अंतर कमी करण्यात येईल. सरावावेळी फलंदाज 22 यार्ड ऐवजी 16 यार्डवर सराव करतील. यामुळे वेगाने बॅटवर येणारा चेंडू खेळण्याची चांगली प्रॅक्टिस होईल.

  • दुसरी गोष्ट नेट्समध्ये पहिल्यांदा चमक असणारा चेंडू वापरला जाईल. कोणत्या चेंडूवर आक्रमण करायचे आणि कोणता चेंडू सोडायचा याची तयारी करणे फलंदाजांना सोयीचे होईल.

  • प्रॅक्सिटस वेळी चेंडू सोडण्याच्या शैलीवर अधिक काम करण्यात येणार आहे. परिस्थितीनुसार गियर बदलण्यासाठी फलंदाज यावर विशेष काम करतील. त्यामुळे ताळमेळ साधणे फलंदाजांसाठी सोयीचे होईल.

हेही वाचा: WTC : अश्विनला विश्वविक्रमाची संधी!

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप- कर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मो. शमी, मो. सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, वृद्धिमान साहा आणि केएल राहुल (फिटनेस टेस्टवर सिलेक्शन)

न्यूझीलंडचा संघ : केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, ड्वेन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जॅकब डफी, मॅट हेन्री, कायल जॅमीसन, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिचेल सँटनर , टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग आणि विल यंग

loading image
go to top