एका रात्रीतल्या श्रीमंतीनं गडबडून गेलेला खेळाडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tymal mills and Kohli

एका रात्रीतल्या श्रीमंतीनं गडबडून गेलेला खेळाडू

sakal_logo
By
सुशांत जाधव

नशीब कधी पलटेल याचा काही नेम नसतो. पुन्हा आयपीएलच्या मैदानात उतरण्याची स्वप्ने पाहणाऱ्या क्रिकेटरच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. गरीबीच्या चटक्यातून सावरत क्रीडा पत्रकारिता करणाऱ्या गड्याने क्रिकेटमध्ये पाउल ठवले. आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. एका रात्रीत तो कोट्याधीश बनला. आयपीएलच्या मैदानात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली त्याने मोजके पाच सामने खेळले. पण RCB ने त्याला खरेदी करताच त्याला लॉटरी लागली. (Story Behind expensive ipl player England pacer Tymal Mills with RCB)

हेही वाचा: WTC : अश्विनला विश्वविक्रमाची संधी!

ही कहाणी आहे इंग्लंडच्या एका सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या टायमल मिल्सची. (tymal mills) 2017 मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याच्यासाठी 12 कोटी रुपये मोजले होते. ही गोष्ट मिल्ससाठी खूप मोठी होती. कोट्यवधी मिळाले पण त्याला क्रिकेटच्या मैदानातील आपली क्षमता सिद्ध करण्यात अपयश आले. मिल्स RCB कडून 5 सामने खेळला यात त्याला केवळ पाच विकेट मिळाल्या. तो महागडा ठरल्याने पुढील सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. एवढ्यावरच त्याची कहाणी संपली नाही तर पुढच्या हंगामात त्याला संधीही मिळाली नाही. सीझन चांगला गेला नसला तरी त्याची दिवस पालटले ही गोष्ट त्याने स्वत: कबुल केलीये.

हेही वाचा: द्रविड कोच होताच पाकिस्तानमधून उमटली अशी प्रतिक्रिया

आरसीबीमधून बाहेर पडल्यापासून मी पुन्हा या स्पर्धेत खेळण्यासाठी प्रयत्न करतोय. पण मला यश मिळत नाही. मोठी रक्कम मिळाल्याचा माझ्यावर दबाव होता. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. जर संपूर्ण हंगामात संधी मिळाली असती तर क्षमता दाखवू शकलो असतो. तो सीझन माझ्यासाठी शेवटचा नव्हता. मी केवळ 28 वर्षांचा असून अजूनही आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहतोय, असे या क्रिकेटरने म्हटले आहे.

मिल्सन क्रिकेटर होण्यापूर्वी क्रीडा पत्रकारितेचे शिक्षण घेतले. पण करियर करण्यासाठी त्याने क्रिकेटला पंसती दिली. त्यातून तो कोट्यधीशही झाला पण त्याला अजूनही आपल्यातील क्षमता सिद्ध करता आलेली नाही. तो आजही मैदानात उतरुन क्षमता सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे.

loading image
go to top