ICC WTC Points Table : आफ्रिकेची झेप; टीम इंडियाच्या एक पाऊल पुढे

ICC WTC Point Table RSA vs BAN
ICC WTC Point Table RSA vs BANSakal

मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश (South Africa vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यातील कसोटी मालिका संपली आहे. डरबन पाठोपाठ पोर्ट एलिझाबेथच्या मैदानातील विजयासह दक्षिण आफ्रिकेनं मालिका 2-0 अशी खिशात घातली. या दिमाखदार मालिकेच्या जोरावर आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पाहुण्या बांगलादेशला 220 धावांनी मात दिली होती. दुसऱ्या कसोटीतही दक्षिण आफ्रिकेनं 332 धावांनी विजय नोंदवला.

ICC WTC Point Table RSA vs BAN
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना थेट मालकीण बाईंचा फोन; म्हणाल्या...

दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच विजय आणि दोन पराभवासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत 60 अंक मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे बांगलादेशचा संघ सहा सामन्यातील एका विजयासह 12 गुणासह आठव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया संघ या गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. कांगारु संघाने आतापर्यंत आठ सामन्यातील पाच सामन्यात विजय नोंदवला आहे. तर तीन सामने त्यांनी अनिर्णित राखले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 72 गुण जमा आहेत.

ICC WTC Point Table RSA vs BAN
केएल राहुलची 'अ‍ॅक्शन' अथिया शेट्टीची 'रिअ‍ॅक्शन' झाली व्हायरल

भारतीय संघाने यंदाच्या सीझनमध्ये आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यातील सहा विजय तर तीन पराभव आणि दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. एका सामन्याचा निकालच लागला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या पाठोपाठ भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज अनुक्रमे पाचव्या, सहाव्या, सातव्या स्थानावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com