WTC INDvsNZ : किवींचा दिमाखदार विजय

सामना रंगतदार स्थितीत असून निकाल काहीही लागू शकतो.
IND vs NZ
IND vs NZTwitter

ICC WTC India vs New Zealand Final Reserve Day : न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात नांगी टाकली. पंतच्या 41 धावा वगळता एकालाही मैदानात तग धरता आला नाही. भारतीय संघाचा दुसरा डाव 170 धावात आटोपला असून न्यूझीलंडला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी 139 धावांचे अल्प आव्हान मिळाले आहे. दुसऱ्या डावात टिम साउदीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. बोल्टने 3, कायले जेमिन्सन 2 आणि नील वेगनारने एक विकेट घेत उत्तम योगदान दिले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मेगा फायनलचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने झुकण्याची चिन्हे दिसत आहेत. पाचव्या दिवसाअखेर टीम इंडियाने 2 बाद 64 धावा केल्या होत्या. इथून पुढे विराट कोहली आणि पुजारा यांनी राखीव दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. या जोडीवर भारतीय संघाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी होती. पण धावफलकावर 71 धावा असताना कोहलीच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. जेमिन्सनने कोहलीला विकेट किपर वॉटलिंगकरवी झेलबाद केले. पहिल्या डावातही कोहलीला जेमिन्सननेच बाद केले होते. जेमिन्सन इथेच थांबला नाही. त्याने संयमी पुजारालाही माघारी धाडले. बोल्टने अजिंक्य रहाणेला माघारी धाडत टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढवल्या. प्रत्येक गोलंदाजाने सामन्यात योगदान द्यायच्या इराद्यानेच न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरल्याचे दिसते. नील वॅगनरने रविंद्र जडेजाला माघारी धाडत याची झलक दाखवन दिली.

170-10 साउदीने बुमराहला खातेही उघडू दिले नाही. भारतीय संघाने दुसऱ्या डावानंतर 138 धावांची आघाडी घेतली असून न्यूझीलंडला विजयासाठी 139 धावांची गरज आहे

170-9 : मोहम्मद शमी 10 चेंडूत 13 धावा करुन माघारी, साउदीला मिळाले यश

156-8 : याच षटकात बोल्टने अश्विनलाही धाडले माघारी, अश्विनने 49 चेंडूत 16 धावांची खेळी केली

156-7 : बोल्टने रिषभ पंतच्या खेळीला लावला ब्रेक, निकोलसने घेतला अप्रतिम झेल. पंतने 88 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 41 धावा केल्या

142-6 : पंत एकटा झुंजतोय, रविंद्र जडेजाने सोडली साथ, नील वॅगनरने टीम इंडियाला दिला सहावा धक्का

109-5 : बोल्टने उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला धाडले माघारी, त्याने 40 चेंडूत 15 धावा केल्या

72-4 80 चेंडूत 15 धावा करुन पुजाराही झेल बाद, जेमिन्सनच्या गोलंदाजीवर टेलरने स्लिपमध्ये घेतला कॅच

71-3 : विराट कोहलीच्या रुपात भारतीय संघान गमावली तिसरी विकेट; जेमिन्सनने पुन्हा एकदा घेतली कोहलीची विकेट

राखीव दिवसाच्या खेळाला सुरुवात; विराट-पुजारा मैदानात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com