संघासाठी एकाच षटकात सहा वेळा 'डाईव्ह' करेन : कोहली 

if needed i will dive for all 6 balls in an over says kohli
if needed i will dive for all 6 balls in an over says kohli

विशाखापट्टणम : 'देशाचं प्रतिनिधित्व करणं हा बहुमानच आहे. संघाला गरज असेल, तर एकाच षटकात सहा वेळा 'डाईव्ह' करायलाही मी तयार आहे..' हे उद्गार आहेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे.. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल दहा हजार धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर विराटने 'बीसीसीआय'च्या अधिकृत संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केले. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने 37 वे शतक झळकाविले. विशेष म्हणजे, जवळपास पूर्ण षटके फलंदाजी करूनही दीडशेवी धाव घेताना कोहलीने 'डाईव्ह' केली. यावरून त्याच्या तंदुरुस्तीचे पुन्हा एकदा प्रदर्शनच झाले. याविषयी मुलाखतीत कोहली म्हणाला, "गेली दहा वर्षे देशाचे प्रतिनिधित्त्व करत आहे, तरीही ही माझी स्वत:ची हक्काची जागा आहे, असे मी मानत नाही. देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना प्रत्येक धाव घेण्यासाठी कठोर मेहनत करावीच लागते. संघाला गरज असेल, तर मी षटकातील सहाही चेंडूंवर 'डाईव्ह' करायला तयार आहे. कारण हे माझे कामच आहे. त्यासाठीच मला संघात निवडले जाते आणि संघासाठी काहीही करणे ही माझी जबाबदारी आहे.'' 

या सामन्यात कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या. 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरचा विक्रम कोहलीने मोडला. सचिनने 259 डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या, तर कोहलीने ही कामगिरी केवळ 205 डावांमध्येच केली. दहा हजार धावा करणारा तो क्रिकेट विश्‍वातील 13 वा फलंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com