Wimbledon | सलग 37 सामने जिंकणारी इगा स्वियाटेक अखेर झाली पराभूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Iga Swiatek 37 Matches Winning Streak Broke In Wimbledon By French Tennis Player Alize Cornet

Wimbledon | सलग 37 सामने जिंकणारी इगा स्वियाटेक अखेर झाली पराभूत

लंडन : सलग 37 सामने जिंकणाऱ्या टेनिसपटू इगा स्वियाटेकची (Iga Swiatek) विजयी घोडदौड अखेर अनुभवी फ्रेंच टेनिसपटू अलिझ कॉर्नेटने (Alize Cornet) रोखली. विम्बल्डनमध्ये (Wimbledon) इगाची हा सलग 37 सामने जिंकण्याचा विक्रमाला ब्रेक लागला. क्रमवारीत 37 व्या स्थानावर असणाऱ्या कॉर्नेटने इगाच्या चुकांचा चांगलाच फायदा उचलला. तिने सामना 6-4, 6-2 अशा सरळ दोन सेटमध्ये जिंकत चौथ्या फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा: DERB vs IND : दिनेश कार्तिक कर्णधार झाल्यानंतर म्हणाला....

टॉप सिडेड इगा स्वियाटेक पहिल्या गेमपासूनच पिछाडीवर पडली होती. त्याच्या दोन सर्व्हिस कॉर्नेटने ब्रेक केल्या होत्या. त्यानंतर इगा पुनरागमन करू शकली नाही. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये इगाने कॉर्नेटची सर्व्हिस ब्रेक केली. मात्र कॉर्नेटने पुन्हा इगाची सर्व्हिस ब्रेक करत सामन्यावर पकड मिळवली. स्वियाटेकने सामन्यात 33 चुका केल्या. तिच्या या ढिसाळ खेळामुळे तिला सामना गमवावा लागला.

इगा स्वियाटेक फेब्रवारी महिन्यात दुबईत जेलेना ओस्टापेन्कोकडून पराभूत झाली होती. त्यानंतर इगाने सलग सहा स्पर्धेत पराभवाचे तोंड पाहिले नव्हते. यात फ्रेंच ओपनचाही समावेश आहे. दुसरीकडे कॉर्नेट ही आपली सलग 62 वी ग्रँडस्लॅम खेळत होती. तिने सुगियामाच्या रेकॉर्डशी बरोबरी केली.

हेही वाचा: ENG vs IND Live : 'कॅप्टन' जसप्रीत बुमराह ऑन फायर; केली तिसरी शिकार

कॉर्नेटने चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिने 2014 विंबल्डन स्पर्धेत तिसऱ्या फेरीत सेरेना विल्यमसचा पराभव केला होता. आता तिने अव्वल स्थानावर असलेल्या इगा स्वियाटेकचा पराभव केला. यानंतर कॉर्नेट म्हणाली, 'आजचा सामना मला आठ वर्षापूर्वी मी सेरेना विल्यमसच्या केलेल्या पराभवाची आठवण करून देत आहे.'

Web Title: Iga Swiatek 37 Matches Winning Streak Broke In Wimbledon By French Tennis Player Alize Cornet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top