World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेकडून ताहिर सर्वाधिक बळी मिळविणारा गोलंदाज 

वृत्तसंस्था
रविवार, 23 जून 2019

 दक्षिण आफ्रिका संघाचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर दक्षिण आफ्रिकेकडून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : दक्षिण आफ्रिका संघाचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर दक्षिण आफ्रिकेकडून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.

विश्‍वकरंडक स्पर्धेत रविवारी पाकिस्तानच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना बाद करून त्याने ही कामगिरी केली. या दोन विकेट्‌स नंतर त्याने स्पर्धेत 39 गडी बाद केले. त्याने ऍलन डोनाल्डला मागे टाकले. डोनाल्डने 38 गडी बाद केले होते. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 10 गडी बाद केले आहेत. स्पर्धेत खेळणारा 40 वर्षीय ताहिर हा सर्वात वयस्क खेळाडू आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Tahir becomes the highest wicket taker from South Africa