INDvBAN : गोलंदाजांची कमाल; पाहुण्यांचा 106 धावांमध्ये उडाला धुरळा!

वृत्तसंस्था
Friday, 22 November 2019

बांगलादेशचा सलामीवीर शादमान इस्लाम, लिटन दास आणि नईम हसन यांचा अपवाद वगळता इतर खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

कोलकाता : ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर भारत-बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्यावहिल्या डे-नाईट कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला.

- #BringBackDhoni धोनीच भारी एमएसके प्रसाद तू खा खारी!

नाणेफेक जिंकत फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरवात खराब झाली. पहिल्या वीस षटकांत बांगलाचा निम्मा संघ तंबूत परतला होता. इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या तेजतर्रार गोलंदाजांनी बांगलाचे वाघ एकापाठोपाठ एक तंबूत धाडले. इशांत शर्माने 5 बळी घेत या सामन्यात सिंहाचा वाटा उचलला. तर उमेश यादवने 3 आणि मोहम्मद शमीने 2 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. 

- आता संजूला क्रिकेट खेळायचा आत्मविश्वास तरी राहिल का?

बांगलादेशचा सलामीवीर शादमान इस्लाम, लिटन दास आणि नईम हसन यांचा अपवाद वगळता इतर खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. आणि 30.3 षटकांत बांगलाचा संघ 106 धावांपर्यंतच पोहचू शकला. 

- मनू भाकरचा विश्वकरंडकात 'सुवर्ण'वेध!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IND BAN Day Night test match Bangladesh inning live news