INDvsAUS: 'माझं प्रेम बायकोपेक्षा विराटवर जास्त'; पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळला जात आहे.
INDvsAUS
INDvsAUS

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळला जात आहे. आज या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. दरम्यान, मैदानावरील एक पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पहिल्या सत्रात चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. तो भारताचा कर्णधार रोहित शर्मासोबत क्रीझवर फलंदाजीला उभा राहताच मैदानात एक पोस्टर झळकले. एका चाहत्याने विराट कोहलीच्याबाबतीत त्याचे असलेले प्रेम व्यक्त केले.

IND vs AUS 1st Test: रोहितची तळपली बॅट; शतकासह इतिहासही घडवला

‘मी विराट कोहलीवर स्वत:च्या बायकोपेक्षा जास्त प्रेम करतो.’ अशा आशयाचे पोस्टर चाहत्याच्या हातात पाहायला मिळालं. हे पोस्टर सध्या सोशल मीडयावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

INDvsAUS
IND vs AUS 1st Test Day 2 LIVE : रविंद्र जडेजाने ठोकलं अर्धशतक

नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या १२ धावा करून विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर टॉड मर्फीने बाद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com