
IND vs AUS: चेन्नईच्या स्टेडियममध्ये झाला गोंधळ! तिसरा ODI सामना 10 मिनिट थांबवला
IND vs AUS 3rd ODI Dog in Stadium : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई येथे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना खेळत आहे. या सामन्यादरम्यान अशी विचित्र घटना घडल्याने स्टेडियममध्ये गोंधळ उडाला, त्यामुळे खेळही 10 मिनिट थांबवावा लागला. सामना थांबला तेव्हा सर्व खेळाडू हसताना दिसले.
डावाच्या 43व्या षटकात एक विचित्र घटना घडली. कुलदीप यादवचे हे शेवटचे षटक होते. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर शॉन अॅबॉटने चौकार मारला. यानंतर एक कुत्रा स्टेडियममध्ये घुसला, त्यामुळे थोडा वेळ खेळ थांबवावा लागला.
दरम्यान, मैदानाचे कर्मचारी त्या कुत्र्याच्या मागे धावताना दिसले. हे सर्व घडत असताना कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यासह अनेक खेळाडू हसताना दिसले.
हा कुत्रा कुठून आला हे कळू शकले नसले तरी स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षकही हसताना दिसले. एवढेच नाही तर हा कुत्रा बराच वेळ मैदानात फिरत होता. दरम्यान सुरक्षा कर्मचारी त्याच्या मागे धावताना दिसले. कुत्र्याला बाहेर काढेपर्यंत खेळ थांबला होता. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.