IND vs AUS : LIVE सामन्यात विकेटकीपिंग सोडून केएल राहुल मैदानातून बाहेर!

IND vs AUS 3rd ODI KL Rahul
IND vs AUS 3rd ODI KL Rahul

IND vs AUS 3rd ODI KL Rahul : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळत आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णयही योग्य ठरला आणि संघाने पहिल्या 10 षटकात बिनबाद 61 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाने या मालिकेत इशान किशन आणि केएल राहुल हे दोन विकेटकीपर घेतले आहेत. पहिल्या मॅचमध्ये रोहित शर्मा नसताना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये इशान किशनला संधी देण्यात आली होती. यानंतर रोहित शर्मा परतल्याने इशान किशन दुसऱ्या सामन्यात बाहेर पडला. यानंतर दुसऱ्या सामन्यात फक्त केएल राहुलच विकेटकीपिंग करताना दिसला.

IND vs AUS 3rd ODI KL Rahul
ICC Rankings : चालू सामन्यात मोहम्मद सिराजकडून हिसकावले सिंहासन! 'या' खेळाडूने पटकावला अव्वल क्रमांक

पहिल्या वनडेचा हिरो केएल राहुल पुन्हा एकदा चर्चेत आला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 16व्या षटकानंतर तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडणारा इशान किशन यष्टिरक्षक म्हणून आला. मालिकेतील पहिल्या सामन्यात इशान आणि राहुल दोघेही प्लेइंग इलेव्हनचा भाग होते. पण विकेटकीपिंग राहुलनेच केले.

IND vs AUS 3rd ODI KL Rahul
Team India News: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू IPL अन् WTC फायनलमधून बाहेर

केएल राहुल मैदानाबाहेर का गेला हे बीसीआयने सांगितलेले नाही. इशान किशन हा नियमित यष्टिरक्षक आहे त्यामुळे त्याच्या बाहेर पडल्यानंतरही टीम इंडियाचे नुकसान होणार नाही. चेन्नईमध्ये उष्णता खूप जास्त आहे. राहुलच्या मैदानातून बाहेर पडण्याचे हे कारण असू शकते.

बदली खेळाडू क्रिकेटमध्ये फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाही. त्याला कर्णधारही करता येत नाही. MCC च्या कायद्यानुसार विकेटकीपिंग करू शकतो 24.1.2. मात्र यासाठी मैदानावरील पंचांची परवानगी घ्यावी लागेल. प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरील खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com