IND vs AUS: गोलंदाज बदला... फलंदाजीची जागा बदलली... बदलले नाही सूर्यकुमार यादवचे नशीब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus 3rd odi suryakumar-yadav

IND vs AUS: गोलंदाज बदला... फलंदाजीची जागा बदलली... बदलले नाही सूर्यकुमार यादवचे नशीब

Ind vs Aus 3rd ODI Suryakumar Yadav : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका सूर्यकुमार यादवसाठी काय चांगली राहिली नाही. तिन्ही सामन्यांत तो गोल्डन डक ठरला. मुंबई आणि विशाखापट्टणमनंतर चेन्नईतही तो पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

टी-20 क्रिकेटमधील नंबर 1 खेळाडूने पहिल्या दोन सामन्यांमध्ये 4 व्या क्रमांकावर गोल्डन डक बनवला, त्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याची फलंदाजीची जागा बदलली. तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी तो क्रीजवर आल्यानंतर गोलंदाजही मिचेल नव्हता, पण तरीही तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अॅश्टन अगरने त्याची विकेट घेतली.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. मिचेल स्टार्कनेच्या वेगवान इनस्विंग चेंडूने त्याला एलबीडब्ल्यू केले. पुढच्या सामन्यात तो रोहित शर्मा बाद झाल्यानंतर क्रीझवर आला. मिचेल स्टार्कने त्याला अगदी त्याच पद्धतीने बाद केले.

यानंतर श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारला चौथ्या क्रमांकावर खेळल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. चेन्नईतील महत्त्वपूर्ण एकदिवसीय सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याचा बचाव केला.

चेन्नई वनडेमध्ये सूर्यकुमार यादवला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. तेव्हा टीम इंडियाची स्थिती चांगली होती. संघाची धावसंख्या 35.1 षटकात 5 बाद 185 अशी असताना विराट कोहली 54 धावांवर बाद झाला होता. विजयासाठी 89 चेंडूत 85 धावा हव्या होत्या. हार्दिक पांड्या 28 धावा करून खेळत होता.

सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आणि त्याला एगरने बोल्ड केले. मात्र, एगरची हॅट्ट्रिकही झाली नाही. गेल्या दोन सामन्यांमध्ये मिचेल स्टार्कची हॅटट्रिक हुकली होती.