Ben Stokes IPL 2023 : चेन्नईला अजून एका विदेशीने दिला दगा; जेमिसननंतर आता स्टोक्स... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ben Stokes IPL 2023 CSK

Ben Stokes IPL 2023 : चेन्नईला अजून एका विदेशीने दिला दगा; जेमिसननंतर आता स्टोक्स...

Ben Stokes IPL 2023 CSK : चेन्नई सुपर किंग्जची डोकेदुखी काही कमी होत नाहीये. आधी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कायल जेमिसनने दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून माघार घेतली आहे. आता इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स देखील आयपीएलमधील काही सामन्यांना मुकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

इंग्लंडचा कसोटी कर्णधार आयर्लंडविरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी एक छोटा ब्रेक घेणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने आयपीएल 2023 चे लीग स्टेजचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. मात्र बीसीसीआयने प्ले ऑफच्या तारखा अजून जाहीर केलेल्या नाहीत. चेन्नई सुपर किंग्ज आपला शेवटचा लीग सामना 20 मे रोजी खेळणार आहे. यामुळे बेन स्टोक्स संपूर्ण लीग सामन्यांसाठी उपलब्ध असू शकतो.

बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सांगितले की, 'होय मी आयर्लंडविरूद्धचा एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वी मी स्वतःला पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न करेन.'

इंग्लंडचा बेन स्टोक्सच नाही तर ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू देखील आयपीएल प्ले ऑफला मुकण्याची शक्यता आहे. इंग्लंडचे खेळाडू हे आयर्लंडविरूद्धचा कसोटी सामना खेळणार आहेत. तर त्याच कालावधीत ऑस्ट्रेलिया जर WTC अंतिम सामन्यात पोहचली तर त्याची तयारी सुरू करेल. त्यामुळे या संघातील काही खेळाडू देखील प्ले ऑफला मुकण्याची शक्यता आहे.

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या लिलावात स्टोक्ससाठी 16.25 कोटी रूपये मोजले आहेत. याचबरोबर स्टोक्सला महेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी म्हणून देखील पाहिले जात आहे. धोनीनंतर कर्णधारपदाच्या शर्यतीत स्टोक्सचे नाव देखील आघाडीवर आहे.

आयपीएल 2023 च्या प्ले ऑफला मुकण्याची शक्यता असलेले विदेशी खेळाडू

  • बेन स्टोक्स

  • सॅम करन

  • जो रूट

  • जॉस बटलर

  • फिल साल्ट

  • जोफ्रा आर्चर

  • जॉनी बेअरस्टो

  • रीसे टॉप्ले

  • हॅरी ब्रुक्स

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!