IND vs AUS Final Video: विराटच्या तोंडावरच मारला थ्रो; मॅक्सवेल बोट दाखवून बोलला तरी किंग शांत राहिला, नेमकं काय घडलं?

IND vs AUS Final Video
IND vs AUS Final Video

IND vs AUS Final Video: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना खेळवला जात आहे. या विजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. रोहित शर्माने भारतीय संघाला वेगात सुरुवात करुन दिली मात्र गील लवकर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला. यावेळी ग्लेन मॅक्सवेलने विराटच्या तोंडावर चेंडू मारला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली आहे. मात्र, शुभमन गिल लवकर बाद झाला. त्याला केवळ 4 धावा करता आल्या. भारताने 7व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या होत्या. रोहित शर्मा 47 धावांची तुफानी इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. (Latest Marathi News)

श्रेयस अय्यरने चौकार मारून त्याची विकेट गमावली. यानंतर विराट कोहलीने राहुलसोबत 67 धावांची भागीदारी केली. कोहली 54 धावा करून बाद झाला. 148 धावांवर भारताने चार विकेट गमावल्या.

IND vs AUS Final Video
Rohit Sharma:ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितचा पराक्रम ! फायनलमध्ये मैदानात उतरताच रचला विक्रम, जाणून घ्या

ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली आयपीएलमध्ये एकाच संघात खेळात. याव्यतीरीक्त दोघे चांगले मित्र देखील आहेत. आज ग्लेन मॅक्सवेलने थेट विराट कोहलीच्या तोंडावर चेंडू फेकून मारला. विराटने चेंडू हाताने अडवला.

त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल  बोट दाखवून इशारा देखील दिला मात्र तरी देखील किंग कोहली शांत होता. त्यानंतर दोघांनी मस्करीने एकमेकांना धक्का दिला.

IND vs AUS Final Video
Ind vs Aus Final : जण गण मन...! दीड लाख लोकांनी एकाच वेळी गायले राष्ट्रगीत, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com