
IND vs AUS: भारताचा एक डाव 132 धावांनी विजय तरी WTC मधून होऊ शकतो बाहेर
India vs Australia WTC : ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 चा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल लंडन येथे खेळल्या जाणार आहे. या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया संघांव्यतिरिक्त श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका देखील अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या शर्यतीत आहेत. हा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. हे जाणून घेऊया...
भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 च्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. नागपूर येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांना अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर जाण्याची शक्यता वाढली आहे. त्याचवेळी गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेले श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका अजूनही अंतिम फेरी गाठण्यासाठी दावेदार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 चा अंतिम सामना होण्याची शक्यता आहे. या दोन संघांमधील अंतिम सामना होण्याची शक्यता 76.9% आहे. अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात होण्याची शक्यता 17.6% आहे. याशिवाय 3.8% हा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाऊ शकतो. त्याच वेळी भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना खेळण्याची शक्यता केवळ 1.7% आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजयामुळे भारत सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनल खेळू शकतो, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील उर्वरित तीन कसोटींमधून आणखी दोन विजयांची गरज आहे, जेणेकरुन 62.50% च्या किमान गुणांसह अंतिम फेरीत स्थान मिळावे. जर भारताचा दोन सामन्यात पराभव झाला तर तिसऱ्या क्रमांकावर असलेला श्रीलंकन संघ पुढे आणि टीम इंडिया बाहेर जाईल.