Ind vs Aus : अक्षरची कमाल, रोहितचा राडा..., भारताने कांगारूचा कसा घेतला बदला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Australia 2nd T20 Nagpur

Ind vs Aus : अक्षरची कमाल, रोहितचा राडा...; भारताने कांगारूचा कसा घेतला बदला?

India vs Australia 2nd T20 Nagpur : टीम इंडियाने शानदार कामगिरी करत दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारताला विजयासाठी आठ षटकांत 91 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने जे चार चेंडू बाकी असताना पूर्ण केले. टीम इंडियाच्या विजयात कर्णधार रोहित शर्मा आणि अक्षर पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा: IND vs AUS : रोहितची कॅप्टन्स इनिंग; त्यावर DK चा फिनिशिंग टच

नागपूर मध्ये ओल्या आउटफिल्डमुळे सामना प्रत्येकी आठ षटकांचा खेळवावा लागला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियन संघ सुरुवातीपासूनच दडपणाखाली दिसला. दुसऱ्याच षटकात त्याने कॅमेरॉन ग्रीन (5) आणि ग्लेन मॅक्सवेल (0) यांच्या विकेट्स गमावल्या. ग्रीनला विराट कोहलीने धावबाद केले, तर मॅक्सवेलला अक्षरने त्याच्या फिरकीच्या जाळ्यात झेलबाद केले. यानंतर अक्षरने टीम डेव्हिडला (2) बॉलिंग करून कांगारू संघाला तिसरा धक्का दिला.

शानदार फलंदाजी करणाऱ्या कर्णधार अॅरॉन फिंचला (31) बुमराहने बोल्ड केले. त्यानंतर मॅथ्यू वेडने आठव्या षटकात हर्षल पटेलला तीन षटकार ठोकले, ज्यामुळे कांगारू संघाला पाच विकेट्सवर 90 धावा करता आल्या. वेड 20 चेंडूत 4 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 43 धावा करत नाबाद राहिला. डावाच्या शेवटच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ (8 धावा) धावबाद झाला.

हेही वाचा: IND vs AUS 2nd T20 : हिटमॅन रोहितची धडाकेबाज फलंदाजी, भारताने मालिका आणली बरोबरीत

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने सुरुवात धमाकेदार केली. जोश हेझलवूडच्या पहिल्याच षटकात रोहित शर्माने दोन आणि केएल राहुलने एक षटकार ठोकला. राहुलला तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अॅडम झाम्पाचा बळी ठरला. केएल राहुल बाद झाल्यानंतर लागोपाठच्या चेंडूंमध्ये कोहली (11) आणि सूर्यकुमार यादव (0) बाद झाले. हार्दिक पांड्या 10 धावा करून झेलबाद झाला.

हार्दिक बाद झाला तेव्हा भारताला सात चेंडूत 14 धावा करायच्या होती. सातव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहितने चौकार मारल्याने विजयाचा मार्ग मोकळा केला. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी 9 धावा करायच्या होत्या, मात्र दिनेश कार्तिकने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने 20 चेंडूत 46 धावा केल्या, ज्यात 4 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे.

Web Title: Ind Vs Aus Rohit Sharma Axar Patel Stars In Team India Win Nagpur 2nd T20 India Vs Australia Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..