IND vs AUS: टीम इंडियाचा हा सुपरस्टार कसोटी करणार पदार्पण! एका फोटोमुळे ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ

India vs Australia Test Series
India vs Australia Test Seriessakal

India vs Australia Test Series : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारतात दाखल झाला असून यावेळी मालिका जिंकायचीच, असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यासाठी सरावासोबत योजना तयार करण्यात आली असून डावपेच आखणे सुरू झाले आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार आहे. दरम्यान, एका फोटोमुळे ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ उडवून दिली.

India vs Australia Test Series
Joginder Sharma: निवृत्तीची घोषणा करताना फसला! जोगिंदरची ढापाढापी आले अंगलट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद सलामीवीर रोहित शर्मा सांभाळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात होणार आहे. या सामन्यातून भारतीय खेळाडू कसोटी पदार्पण करू शकतो. याच स्टार खेळाडूने शुक्रवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केले, ज्यामुळे त्याला प्लेइंग-11 चा भाग बनवले जाईल अशी अटकळ बांधली जात आहे.

India vs Australia Test Series
Deepak Chahar Wife: दीपक चहरच्या बायकोला शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी! काय आहे प्रकरण

टी-20 सुपरस्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने शुक्रवारी इन्स्टा स्टोरीवरून एक फोटो पोस्ट केला. फोटोत फक्त लाल बॉल आहे जो टॉवेलवर ठेवलेला दिसत आहे. यासोबत त्याने लिहिले - नमस्कार मित्रा. त्यामुळे संघ व्यवस्थापनाकडून सूर्यकुमार यादवला प्लेइंग-11 चा भाग बनवण्याचे काही संकेत दिले जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूर्यकुमारने आत्तापर्यंत 20 एकदिवसीय आणि 48 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु त्याला कसोटी प्रकारात संधी मिळालेली नाही.

India vs Australia Test Series
Asia Cup: भारतासमोर पाकिस्तान पुन्हा गुडघ्यावर! BCCI ठरवणार भवितव्य, आज होणार मोठा निर्णय?

32 वर्षीय सूर्यकुमार यादवने भारतासाठी आतापर्यंत 20 एकदिवसीय आणि 48 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 3 शतके आणि 13 अर्धशतके आहेत. या छोट्या फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 1675 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 2 अर्धशतकांसह एकूण 433 धावा केल्या आहेत. त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटचा खूप अनुभव आहे आणि त्याने 79 सामन्यांमध्ये 14 शतकांसह एकूण 5549 धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com