Sarfaraz Khan: निवड समितीने केला रणजी ट्रॉफीचा अपमान! तब्बल 122.75ची सरासरी तरी वगळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus test Sarfaraz Khan

Sarfaraz Khan: निवड समितीने केला रणजी ट्रॉफीचा अपमान! तब्बल 122.75ची सरासरी तरी वगळले

India vs Australia Test Series: भारतीय निवडकर्त्यांनी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे, तर पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामने खेळल्या जाणार आहेत. सध्या निवड समितीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीच संघ जाहीर केला आहे. एक युवा खेळाडू या संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. हा खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे.

हेही वाचा: IND vs NZ: हार्दिक पाड्याचं एकछत्री राज्य; BCCIने केले रोहित-विराटचे करिअर एंड?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती असणार आहे, मात्र युवा फलंदाज सर्फराज खान पुन्हा एकदा या संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. सरफराज खान गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे, परंतु तो अजूनही टीम इंडियामध्ये पहिल्या संधीची वाट पाहत आहे. सर्फराज खानने आयपीएलमधूनच स्वतःची ओळख निर्माण केली होती.

हेही वाचा: IND vs AUS: 'कॅप्टन' हार्दिक पांड्याने कसोटीतुन घेतली निवृत्ती?

सरफराज खानची निवड न झाली नाही त्यामुळे चाहते नाराज झाला नाही. 2021-22 च्या रणजी ट्रॉफीच्या आवृत्तीत जिथे मुंबई उपविजेते झाली, सरफराजने 122.75 च्या सरासरीने तब्बल 982 धावा केल्या ज्यामध्ये चार शतके, दोन अर्धशतके आणि 275 च्या सर्वोच्च धावसंख्येचा समावेश आहे. एका चाहत्याने लिहिले की, “सरफराज संजूसारखे सोशल मीडिया फॅन फॉलोअर नसल्यामुळे तो बाहेर आहे. बिचार्‍याने संघात येण्यासाठी पुरेशी कामगिरी केली आहे. इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे की त्याचा समावेश नाही.

हेही वाचा: Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीचा आज फैसला! सदगीर, राक्षे, गायकवाड, शेख यांच्यात चुरस

25 वर्षीय सरफराज खानने आतापर्यंत 36 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने 80.47 च्या सरासरीने 3380 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये 2000 हून अधिक धावा केल्यानंतर, फक्त सर डॉन ब्रॅडमन यांचीच त्यांच्यापेक्षा चांगली सरासरी आहे. तर 26 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 39.08 च्या सरासरीने 469 धावा केल्या आहेत.