IND vs NZ: हार्दिक पाड्याचं एकछत्री राज्य; BCCIने केले रोहित-विराटचे करिअर एंड?

संघाच्या घोषणेने रोहित आणि विराटची सुवर्ण कारकीर्द संपली!
rohit sharma virat kohli
rohit sharma virat kohlisakal

India Squad for New Zealand T20 Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी रात्री न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला संघातून वगळणे ही या संघाबद्दल चाहत्यांना सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. या दोन्ही दिग्गजांना टी-20 मालिकेसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. टी-20 संघाची कमान अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे.

rohit sharma virat kohli
IND vs AUS: 'कॅप्टन' हार्दिक पांड्याने कसोटीतुन घेतली निवृत्ती?

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 18 जानेवारीला हैदराबादमध्ये होणार आहे. त्यानंतर 27 जानेवारीपासून रांचीमध्ये टी-20 मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा टी-20 सामना 29 जानेवारीला लखनऊमध्ये तर शेवटचा टी-20 सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

rohit sharma virat kohli
Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीचा आज फैसला! सदगीर, राक्षे, गायकवाड, शेख यांच्यात चुरस

बीसीसीआयने टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवले आहे. निवड समितीने 16 सदस्यीय संघाची निवड केली आहे. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव संघाचा उपकर्णधार असणार आहे. पहिल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. यानंतर टीम इंडियाला 9 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

rohit sharma virat kohli
Prithvi Shaw : अखेर 379 धावा करणारा पृथ्वी शॉ 537 दिवसांनंतर टीम इंडियात परतला

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गजांना टी-20 संघात स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे हे दोघे क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये क्वचितच दिसणार असल्याचे संकेत बोर्डाने दिले आहेत. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षी भारतात आयोजित केला जाणार आहे आणि बोर्डाचे लक्ष आहे की भारताने 12 वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकावी.

यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 115 सामने खेळले आहेत तर रोहितने 148 सामने खेळले आहेत. दोघेही आयसीसी टी-20 वर्ल्ड कप-2022 मध्ये शेवटच्या वेळी या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसले होते.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया : हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com