IND vs AUS: 'कॅप्टन' हार्दिक पांड्याने कसोटीतुन घेतली निवृत्ती? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hardik pandya

IND vs AUS: 'कॅप्टन' हार्दिक पांड्याने कसोटीतुन घेतली निवृत्ती?

IND vs AUS Hardik Pandya : IPL 2022 पासून हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी करत आहे. कर्णधार म्हणून त्याने गुजरात टायटन्सला पहिले चॅम्पियन बनवले. यानंतर द्विपक्षीय मालिकेसाठी त्याला बीसीसीआयने टी-20 चे कर्णधार बनवले. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही.

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सध्याच्या एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर पांड्याला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. केएल राहुल खराब कामगिरीमुळे या शर्यतीतून बाहेर पडला. बोर्डाने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. यात पांड्याचा समावेश नव्हता. याआधी त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपासूनही दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे आता एक प्रश्न पडला आहे की हार्दिक पांड्याने कसोटीतुन निवृत्ती घेतली आहे का ?

हेही वाचा: Virat Kohli : विराटही झाला होता कॅप्टन्सीसाठी उतावळा; धोनीने कसोटी कॅप्टन्सी देऊनही विराटने...

हार्दिक पांड्याचा कसोटी संघात समावेश न करून बीसीसीआयने त्याच्यासोबत कोणतीही जोखीम पत्करायची नाही असा स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित तो अजूनही लाल चेंडूच्या क्रिकेटसाठी पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, पांड्याने पहिल्या सामन्यात 6 षटके टाकली तर दुसऱ्या सामन्यात त्याने 5 षटके टाकली. म्हणजेच एकदिवसीय सामन्यातही तो पूर्ण 10 षटके टाकत नाही. जरी तो बहुतेक सहावा गोलंदाज म्हणून वापरला जातो.

हेही वाचा: Prithvi Shaw : अखेर 379 धावा करणारा पृथ्वी शॉ 537 दिवसांनंतर टीम इंडियात परतला

हार्दिक पांड्याने शेवटची कसोटी सप्टेंबर 2018 मध्ये खेळली होती. म्हणजेच 5 वर्षांपासून तो एकही कसोटी खेळलेला नाही. पंड्याने 11 कसोटीत 31 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत. एक शतक आणि 4 अर्धशतकं झळकावली आहेत. 108 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याचबरोबर गोलंदाज म्हणून त्याने 31 च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या आहेत. 28 धावांत 5 बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

हेही वाचा: IND vs SL: गौतम पुन्हा 'गंभीर'रित्या विराट कोहलीवर बरसला! 'शतक ठोकणे चांगले, पण...'

अष्टपैलू हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे बराच काळ त्रस्त होता. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. याशिवाय जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलही आहे. भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या शर्यतीत कायम आहे.

जेतेपदाचा सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. जर भारतीय संघ अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला तर पंड्याला येथे संधी मिळू शकते का ? वेगवान गोलंदाज म्हणून तो इंग्लंडच्या खेळपट्टीवर संघासाठी फायदेशीर ठरू शकतो का ? भारतीय संघ सध्या रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या बड्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे हैराण आहे.