
IND vs AUS: मयंक अग्रवालचे ट्वीट चर्चेत! BCCIच्या निवडकर्त्यांना दिला थेट इशारा
Ind vs Aus Test Series : भारताचा सलामीचा फलंदाज मयंक अग्रवाल बराच काळपासून संघातुन बाहेर आहे. नुकतेच मयंकने रणजी ट्रॉफी सामन्यात बॅटने द्विशतक झळकावले. असे असूनही संघात स्थान मिळवणे त्याच्यासाठी सोपे नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे ओपनिंग स्लॉटसाठीची जोरदार स्पर्धा आहे.
खरे तर खराब फॉर्मशी झगडत असलेल्या केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आल्याची चर्चा आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाणार नाही, अशी अपेक्षा आहे.
केएल राहुलकडून कसोटी फॉरमॅटमधील कर्णधारपद हिरावून घेण्यात आले आहे. अशा परिस्थितीत निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन केएल राहुलला सोडण्याच्या मनस्थितीत आहे, असा संदेश स्पष्ट आहे. नुकतेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. चांगली कामगिरी करूनही गिल संधीची वाट पाहत आहे.
यावेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे सोपे नाही हे मयंक अग्रवालला माहीत आहे. अशा परिस्थितीत बुधवारी रात्री त्यांनी ट्विटद्वारे निवड समितीला संदेश देण्याचा प्रयत्न केला. मयंकने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बॅटसोबत दिसत आहे. बॅटच्या एका बाजूला अंक लिहिलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला रेषा आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, अशा प्रकारे फलंदाजी क्रम कोण निवडत. गली क्रिकेटमध्ये अशा प्रकारे संघ आणि फलंदाजीची क्रमवारी निवडली जाते.
या ट्विटद्वारे मयंक अग्रवाल निवडकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, तो टीम इंडियामध्ये कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार आहे. केवळ मयंकच नाही तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा सरफराज खानही संघात संधीच्या प्रतीक्षेत आहे.