IND vs AUS: भारतात आल्यानंतर स्टीव्ह स्मिथ बायकोला विसरला! 2 मुलांच्या आईला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Steve Smith IND vs AUS Test

IND vs AUS: भारतात आल्यानंतर स्टीव्ह स्मिथ बायकोला विसरला! 2 मुलांच्या आईला...

Steve Smith IND vs AUS Test : व्हॅलेंटाईन डे! या दिवशी लोक आपलं प्रेम आपल्या प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करतात, पण आजच्या युगात ते सोशल मीडियावरही उघडपणे व्यक्त करतात. सोशल मीडियाच्या या जमान्यात मात्र लहानसहान चुका होत असतात. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही अशीच चूक केली असून पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करताना त्याने एका 2 मुलांच्या महिलेला टॅग केले.

सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारत दौऱ्यावर आहे. पाहुण्या संघाने नागपुरातील पहिला कसोटी सामना गमावला आहे. आता संघ आपला दुसरा सामना १७ फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे.

त्या एका चुकीमुळे स्मिथ आज चर्चेचा विषय ठरला. आपल्या पत्नी डॅनी विलिसला व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देताना त्याने लिहिले, “माझ्या सुंदर पत्नी @dani_willis ला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. आता तुला भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. यामध्ये त्याने पत्नीऐवजी त्याच नावाने दुसऱ्या महिलेला टॅग केले. दरम्यान स्मिथसाठी एक चांगली गोष्ट म्हणजे त्याची पत्नी डॅनी विलिस ट्विटरवर फारशी सक्रिय नाही. डॅनी विलिसने त्याचे शेवटचे रिट्विट सुमारे पाच वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी 2018 मध्ये केले होते आणि त्यांनी जानेवारी 2017 मध्ये ट्विट केले होते.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना नागपुरात झाला. या सामन्यात स्मिथ पूर्णपणे फ्लॉप दिसला. त्याने पहिल्या डावात 37 आणि दुसऱ्या डावात 25* धावा केल्या. यानंतरही तो दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. पाहुण्या संघ दुसऱ्या डावात अवघ्या 91 धावांत सर्वबाद झाला.