IND vs AUS : थलैवाची ग्रँड एंट्री ऑस्ट्रेलियाला आलं टेन्शन! रजनीकांत मुंबईच्या स्टेडियममध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus Thalaiva in the house Superstar Rajinikanth watches the India vs Australia ODI in Mumbai cricket news in marathi

IND vs AUS : थलैवाची ग्रँड एंट्री ऑस्ट्रेलियाला आलं टेन्शन! रजनीकांत मुंबईच्या स्टेडियममध्ये

Rajinikanth Watches India vs Australia ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईत खेळल्या जात आहे. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. सध्या एकदिवसीय क्रमांकाचा एकदिवसीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर हेडकेला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

दरम्यान, भारतीय संघाचे मनोबल उंचावण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित आहेत. थलैवाची एंट्रीने ऑस्ट्रेलियाला कोठे तरी टेन्शन आलं आहे. काही दिवसांपूर्वी रनजीकांत यांनी युवा फलंदाज संजू सॅमसनचा पाहुणचार केला होता.

मुंबईत खेळल्या जात असलेला सामना पाहण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निमंत्रणावरून या अभिनेत्याने पहिला एकदिवसीय सामना पाहण्यास होकार दिला होता. रजनीकांत शुक्रवारी मुंबईला आले आणि एमसीए अध्यक्षांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर देखील सुपरस्टार रजनीकांतचा फॅन आहे.

रजनीकांत हे क्रिकेट शौकीन आहे पण शूटिंगच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांना स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी क्वचितच वेळ मिळतो. आज वेळात वेळ काढून पत्नी लता रजनीकांतसह एकदिवसीय सामना पाहण्यासाठी मुंबईत दाखल आले.

रजनीकांत सध्या नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित चित्रपट 'जेलर'साठी शूटिंग करत आहेत. चित्रपटाचे 80% शूटिंग पूर्ण झाले आहे आणि लवकरच पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये जाईल.