WTC Final 2023 : 'कागदावर कांगांरूंचे पारडे जड; मात्र भारताला...' दोन दिग्गजांच्या वक्तव्याने खळबळ

इंग्लंडचे हवामान, खेळपट्टी यानुसार कागदावर तरी ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे परंतु....
Ind vs Aus WTC Final 2023
Ind vs Aus WTC Final 2023SAKAL

Ind vs Aus WTC Final 2023 : इंग्लंडचे हवामान, खेळपट्टी यानुसार कागदावर तरी ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे; परंतु जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी तयारीच्या आघाडीवर भारतीय संघ एक पाऊल पुढे आहे, असा अंदाज रवी शास्त्री आणि रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केला आहे.

ज्या ओव्हल मैदानावर हा अंतिम सामना होणार आहे त्या मैदानाची खेळपट्टी नेहमीपेक्षा अधिक ताजीतवानी राहील. १४० वर्षांच्या इतिहासात या मैदानावर जून महिन्यात कधीही कसोटी सामना झालेला नाही.

Ind vs Aus WTC Final 2023
WTC 2023 : WTC फायनलपूर्वी कोच द्रविडचे मोठे वक्तव्य! हे दोन खेळाडू देणार विश्वचषक जिंकून

शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०२१ च्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापर्यंत प्रवास केला होता. आता जसप्रीत बुमरा संघात असता तरी भारतीय संघ फेव्हरिट ठरला नसता, तरी पारडे समसमान झाले असते, असे शास्त्री यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणतात, बुमरा संघात असता तर शमी-सिराज-बुमरा असा भारताचा वेगवान मारा झाला असता; परंतु ऑस्ट्रेलियाकडे मिशेल स्टार्क आणि पॅट कमिंस असे विख्यात आक्रमक वेगवान गोलंदाज आहेत. या दोघांच्या तंदुरुस्तीचा प्रश्न येऊ शकतो, हेसुद्धा तेवढेच खरे आहे.

Ind vs Aus WTC Final 2023
WTC Final 2023 : भारत-ऑस्ट्रेलिया WTC अंतिम सामना होणार रद्द? मोठे अपडेट आले समोर

भारतीय संघातील खेळाडू दोन महिने टी-२० क्रिकेट खेळले असल्यामुळे फॉर्मच्या पार्श्वभूमीवर फरक पडू शकतो, शास्त्री यांच्या या मताला पाँटिंग आणि अक्रम यांनी दुजोरा दिला. मॅच फिटनेसच्या दृष्टीने भारतीय खेळाडू उजवे आहेत. नेटमध्ये दोन तास सराव करणे आणि सामन्यासाठी मैदानावर चार-पाच तास खेळणे यात फरत असतो. मोहम्मद शमी आयपीएलमध्ये सर्व सामने खेळला आहे. त्यामुळे लय त्याच्या पाठीशी आहे, असे शास्त्री यांनी सांगितले.

पाँटिंग हे काहीशा द्विधा मनस्थितीत आहेत. भरपूर प्रमाणात टी-२० सामने खेळण्याचा फायदा अधिक होईल की या सामन्यापूर्वी कोणतीही मॅट प्रॅक्टिस नसल्यामुळे ताजेतवाने रहाणे उपयोगी ठरेल, याबाबत पाँटिंग स्पष्ट मत व्यक्त करू शकले नाहीत.

ऑस्ट्रेलिया संघातील बहुतेक खेळाडू गेल्या एक-दोन महिन्यांत कोणतेच स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाहीत. हे फायद्याचे आहे की दोन महिन्यांत सलग खेळल्याचा काहीसा थकवा परिणामकारक होऊ शकेल, या प्रश्नावर पाँटिंग ठोस उत्तर देऊ शकले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com