WTC 2023 : WTC फायनलपूर्वी कोच द्रविडचे मोठे वक्तव्य! हे दोन खेळाडू देणार विश्वचषक जिंकून | Rahul Dravid | Team India | Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ind vs Aus WTC Final 2023

WTC 2023 : WTC फायनलपूर्वी कोच द्रविडचे मोठे वक्तव्य! हे दोन खेळाडू देणार विश्वचषक जिंकून

Ind vs Aus WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना सात जूनपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. त्याला शेवटच्या वेळी 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे, तेव्हा त्यांची नजर आयसीसी ट्रॉफी जिंकण्यावर असेल.

भारतीय संघातील खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. पुजारासारखा महत्त्वाचा खेळाडू इथे ससेक्स कौंटीकरिता खेळत होता, त्याच्या अनुभवांचा फायदा होतो आहे. इथल्या वातावरणाचा विचार करून गोलंदाजांना काय टप्प्यावर मारा करायचा आहे याचा सराव आम्ही विचारपूर्वक केला आहे, असे भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले.

सामन्याच्या दोन दिवस अगोदर भारतीय खेळाडू मैदानावर येऊन जोरदार सराव करताना दिसले. ओव्हल मैदानाची खेळपट्टी तयार करायला कर्मचारी झटताना दिसले, तेव्हा राहुल द्रविड खेळपट्टीभोवती थोडा वेळ अंदाज घेण्यासाठी रेंगाळताना दिसला.

अजिंक्य परत आला हे फायद्याचे

अजिंक्य रहाणे भारतीय संघात परतल्याचा फायदाच होणार असल्याचा निर्वाळा राहुल द्रविडने दिला. अजिंक्यकडे भरपूर मोठा अनुभव आहे. त्याचा परदेशातील खेळ नेहमीच चांगला राहिला आहे. संघातून बाहेर जाऊन परतल्याने त्याची भूक वाढली आहे. स्लीपमध्ये झेल पकडण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. त्याने संघाचे यशस्वी नेतृत्वही केल्याचे द्रविड म्हणाले.