Ind vs Aus WTC Final 2023: टीम इंडियाची अनोखी खेळी! हवामानामुळे चेंडूची दिशा बदलू शकते म्हणून...

लंडनमधील थंडी आणि हवा यामुळे सरळ दिशेत येणारा चेंडू अंतिम क्षणी दिशा बदलू शकतो यामुळे...
Ind vs Aus WTC Final 2023
Ind vs Aus WTC Final 2023sakal

Ind vs Aus WTC Final 2023 : लंडनमधील थंडी आणि हवा यामुळे सरळ दिशेत येणारा चेंडू अंतिम क्षणी दिशा बदलू शकतो. यामुळे सोपा वाटणारा झेलही सुटू शकतो. यावर भारतीय संघ व्यवस्थापनाने उपाय शोधला आहे. विविध रंगांच्या रबर चेंडूंवर सध्या भारतीय खेळाडू झेलांचा सराव करत आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने सरावात कोणतीही कमतरता ठेवली नाही. अरुंदेल क्रिकेट मैदानावर भारतीय संघाचा सराव सुरू आहे. त्यात क्षेत्ररक्षणासाठी हा नवा प्रकार दिसून येत आहे.

Ind vs Aus WTC Final 2023
Thailand Open Lakshya Sen: विजेतेपदाचे ‘लक्ष्य’ हुकले! थायलंड ओपन बॅटमिंटन स्पर्धेत सेन उपांत्य फेरीत पराभूत

मुख्यत्वे स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणारा शुभमन गिल हिरव्या रंगाच्या चेंडूवर झेल पकडण्याचा सराव करत आहे. लॉन टेनिसमध्ये वापरण्यात येणारा नसला तरी वेगळ्या प्रकारचा पिवळा चेंडूही जवळच्या क्षेत्ररक्षकांसाठी वापरण्यात येत आहे.

गल्ली क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारे नव्हे तर वेगळ्या प्रकारचे रबरी चेंडू क्षेत्ररक्षणाच्या या सरावासाठी वापरण्यात येत आहेत. या चेंडूंना ‘रिअॅक्शन चेंडू’ म्हणून संबोधले जाते. जेथे हवामान थंड आणि वारे असतात त्या इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये अशा प्रकाराच्या चेंडूंवर क्षेत्ररक्षणाचा सराव केला जातो, अशी माहिती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील एका प्रसिद्ध क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांनी दिली.

Ind vs Aus WTC Final 2023
French Open 2023: आजारपणामुळे रायबाकिनाची तिसऱ्या फेरीतून माघार

अशा प्रकाराच्या रंगीत चेंडूवर झेल पकडण्याचा सराव करण्याचे कोणते ठराविक शास्त्रीय कारण आहे याबाबत मला माहीत नाही, परंतु इंग्लंडमधील खेळपट्ट्या थंड हवामानामुळे काहीशा ओलसर असतात; तर बाहेरचे मैदान हिरवेगार असते, त्यामुळे चेंडू दिशा बदलू शकतो, असे शुभमन गिलने सांगितले.

इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये वातावरणामुळे चेंडू अनेकदा बॅटची कडा लागून यष्टींच्या पाठीमागे येत असतो, त्यात ड्युक बनावटीचे चेंडू बॅटची कडा लागल्यानंतर अधिक प्रमाणात दिशा बदलतात याचा सराव होण्यासाठीसुद्धा हा प्रयोग आम्ही करत असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com