Ind vs Ban 1st Test: अश्विन-कुलदीपने केली कमाल! टीम इंडियाचा पहिला डाव 404 धावांवर...

Ind vs Ban 1st Test
Ind vs Ban 1st Testsakal

Ind vs Ban 1st Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने सहा गडी गमावत 278 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यर आणि आर अश्विन फलंदाजीला आले मात्र अय्यरला 86 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्याचवेळी आर अश्विननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या आहेत.

Ind vs Ban 1st Test
FIFA WC22: फ्रान्स का अर्जेंटिना; 165 कोटींची ट्रॉफी कोणाच्या खिशात जाणार?

भारतीय कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिलसह त्याने चांगली सुरुवात केली. मात्र गिल 20 धावा करून बाद झाला. यावेळी संघाची धावसंख्या 41 धावा होती. गिल पॅव्हेलियनमध्ये परतताच कर्णधार राहुल आणि विराट कोहलीही बाद झाले. 48 धावांवर तीन विकेट गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. यानंतर पंत आणि पुजाराने भारतीय डाव सांभाळला, दोघांनी चौथ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. यानंतर पंतही 46 धावा करून बाद झाला.

श्रेयससह पुजाराही शानदार फलंदाजी करत आपापली अर्धशतके पूर्ण केली. मात्र दिवसअखेर पुजारा शतक गाठण्यापूर्वीच बाद झाला. त्याने 95 धावांची खेळी खेळली. यानंतर अक्षरने श्रेयससोबत 19 धावा जोडल्या, पण दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षरही बाद झाला.

Ind vs Ban 1st Test
IND vs BAN: चार वर्षांची प्रतीक्षा लांबली! शतक हुकल्यानंतर चेतेश्वर पुजाराचा मोठा खुलासा...

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच श्रेयस अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर कुलदीप यादव आणि अश्विनने आठव्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या 385 धावांपर्यंत नेली. अश्विन 58 आणि कुलदीप 40 धावांवर बाद झाला. शेवटी उमेशने दोन षटकारांच्या मदतीने भारताची धावसंख्या 404 पर्यंत नेली. बांगलादेशकडून तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी चार बळी घेतले. खालेद अहमद आणि इबादत हसन यांना ब्रेकथ्रू मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com