IND vs BAN: ही कसली रणनीती; गेल्या सामन्यातील 'हिरो'ची हकालपट्टी

ind vs ban 2nd test kuldeep yadav dropped from playing11
ind vs ban 2nd test kuldeep yadav dropped from playing11

Team India's Playing-11 Kuldeep Yadav OUT: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मीरपूर येथे खेळल्या जात आहे. या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार शाकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने या सामन्यात दोन बदल केले असून टीम इंडियाने एक बदल केला आहे.

ind vs ban 2nd test kuldeep yadav dropped from playing11
IND vs BAN: अखेर 12 वर्षानंतर प्रदीर्घ प्रतिक्षा संपली! उनाडकटला मिळाली संधी

कर्णधार केएल राहुलने मिरपूर कसोटीत टीम इंडियात मोठा बदल केला आहे. संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवच्या जागी जयदेव उनाडकटला स्थान दिले. टीम इंडियाच्या या निर्णयावर चाहते प्रचंड संतापले आहेत. शेवटच्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला होता. त्याने एकूण 8 विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत त्याला प्लेइंग-11 मधून वगळणे भारतीय चाहत्यांना पसंत नाही.

ind vs ban 2nd test kuldeep yadav dropped from playing11
Ajinkya Rahane: माझीच नाही विराट-पुजाराची कामगिरी ढासळली, BCCI वर अजिंक्यचा पलटवार

कुलदीप यादवने याआधी अनेक वेळा भारतीय संघासाठी कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तरी तो सतत संघातुन बाहेर होता. अशा परिस्थितीत टीम इंडिया नियमितपणे प्लेइंग-11 मध्ये एवढ्या दमदार गोलंदाजाचा समावेश का करत नाही, असा संताप चाहत्यांना आहे.

मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमची विकेटही अधिक फिरकीपटू अनुकूल आहे. अशा परिस्थितीत स्पिनरऐवजी अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय चाहत्यांनाही समजू शकलेला नाही. चाहते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com