Ajinkya Rahane: माझीच नाही विराट-पुजाराची कामगिरी ढासळली, BCCI वर अजिंक्यचा पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajinkya Rahane

Ajinkya Rahane: माझीच नाही विराट-पुजाराची कामगिरी ढासळली, BCCI वर अजिंक्यचा पलटवार

Ajinkya Rahane : रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणेने द्विशतक झळकावून पुनरागमन केले आहे. तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. पण तरीही त्याने पुनरागमनाची आशा सोडलेली नाही. रहाणेने रणजी ट्रॉफी सामन्यात हैदराबादविरुद्ध मुंबईकडून खेळताना द्विशतक केले. रहाणेने 204 धावा केल्या. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर रहाणेला गेल्या 3 वर्षांत केवळ एक शतक आणि 2 अर्धशतके झळकावता आली आहेत.

हेही वाचा: Hardik Pandya : BCCIची रोहित शर्मावर मोठी कारवाई; कर्णधारपद हिसकावून 'या' दिग्गजाकडे सोपवलं

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, मी कोहली आणि पुजाराने फलंदाज म्हणून कोणतीही चूक केली नाही. नंबर-3, नंबर-4 आणि नंबर-5 बद्दल बोलायचे तर तुम्हाला दिसेल की सर्व बॅटर्सची सरासरी खाली आली आहे. विकेटमुळे हे घडले आहे. त्यात फार चुका झाल्या आहेत असे मला वाटत नाही, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना तो म्हणाला की, मधल्या फळीतील फलंदाजांसाठी फलंदाजी करणे कठीण झाले आहे. सलामीवीरांना कठीण चेंडू मिळत असल्याने ते सोपे असते, पण जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो, तेव्हा आपण विचार करतो की आपण कुठे चुकलो. अजिंक्य रहाणे स्वत:बद्दल म्हणाला की, त्याला काहीही सिद्ध करायचे नाही, पण एक गोष्ट नक्की, मी कधीही हार मानणार नाही.

हेही वाचा: PCB Chairman Najam Sethi : देशद्रोहाचे आरोप झालेले PCB चे नवे चेअरमन नजम सेठी आहेत तरी कोण?

अजिंक्य रहाणेने कामगिरी खाली येण्याबद्दल जे सांगितले आहे, जर तुम्ही आकडे बघितले तर ते अगदी बरोबर दिसते. 2017 ते 2019 या तीन वर्षात भारतातील नंबर-3 ते नंबर-5 फलंदाजांची कामगिरी पाहिली तर कोहलीने 31 डावांमध्ये 49 च्या सरासरीने सर्वाधिक 1458 धावा केल्या. 5 शतके झळकावली. पुजाराने 29 डावात 45 च्या सरासरीने 1268 धावा केल्या आणि 6 शतके झळकावली. तर रहाणेने 26 डावात 41 च्या सरासरीने 983 धावा केल्या. 2 शतके आणि 7 अर्धशतके केली. कसोटीबद्दल बोलायचे झाले तर पुजारा नंबर-3 वर, कोहली नंबर-4 आणि रहाणे बहुतेक नंबर-5 वर खेळतो.