IND vs BAN: अखेर 12 वर्षानंतर प्रदीर्घ प्रतिक्षा संपली! उनाडकटला मिळाली संधी : Jaydev Unadkat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jaydev Unadkat India vs Bangladesh 2nd Test Match

IND vs BAN: अखेर 12 वर्षानंतर प्रदीर्घ प्रतिक्षा संपली! उनाडकटला मिळाली संधी

Jaydev Unadkat India vs Bangladesh 2nd Test Match : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना सुरु झाला आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मीरपूरच्या शेरे-ए-बांगला स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने सौराष्ट्रचा अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचा संघात समावेश केला आहे. जयदेव 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टीम इंडियासाठी कसोटीत खेळताना दिसणार आहे.

हेही वाचा: Lionel Messi : आता अर्जेंटिनाच्या नोटेवर दिसणार 'मेस्सी'; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मीरपूरच्या शेरे-ए-बांगला स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मोठा बदल करताना टीम इंडियाने कुलदीप यादवला विश्रांती दिली आहे. त्याचबरोबर या सामन्यात त्याच्या जागी जयदेव उनाडकटचा समावेश करण्यात आला आहे. 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयदेवचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. आता उनाडकट बांगलादेशविरुद्धच्या या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो. आगामी कसोटी मालिकेसाठी आपले स्थान निश्चित करू इच्छितो.

हेही वाचा: Ajinkya Rahane: माझीच नाही विराट-पुजाराची कामगिरी ढासळली, BCCI वर अजिंक्यचा पलटवार

जयदेव उनाडकटबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2010 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. मात्र त्यावेळी त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने आपल्या कारकिर्दीतील एकमेव कसोटी सामना सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. 12 वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या उनाडकटने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दोन कसोटी सामने खेळण्यातील जास्त अंतराच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पहिल्या आणि या कसोटीदरम्यान 118 कसोटी सामने झाले. या यादीत उनाडकट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय संघ - KL राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट.