IND vs BAN: दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का! हा दिग्गज खेळाडू मालिकेतून बाहेर

भारताच्या आगामी मालिकेतील महत्त्वाचे सामने पाहता बीसीसीआय कोणताही धोका पत्करायचा नाही त्यामुळे...
IND vs BAN Rohit Sharma Ruled Out
IND vs BAN Rohit Sharma Ruled Outsakal

IND vs BAN Rohit Sharma Ruled Out : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पुढील सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळल्या जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. खरं तर संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा बोटाला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला आहे.

IND vs BAN Rohit Sharma Ruled Out
FIFA WC22: फायनल अर्जेंटिना अन् फ्रान्सची दंगल केरळमध्ये, एकाचा मृत्यू

क्रिकबझच्या वृत्तानुसार बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नसणार आहे. रोहित संघात सामील होईल अशी अपेक्षा होती पण आता तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याची बातमी समोर येत आहे. भारताच्या आगामी मालिकेतील महत्त्वाचे सामने पाहता बीसीसीआय आणि निवड समितीला कोणताही धोका पत्करायचा नाही.

IND vs BAN Rohit Sharma Ruled Out
Team India: BCCI 'या' तारखेला ठरवणार रोहित-द्रविडचे भवितव्य, दोघांचाही होणार पत्ता कट

वृत्तानुसार, रोहित शर्मा फलंदाजी करण्यास पूर्णपणे सक्षम आहे परंतु क्षेत्ररक्षणाबाबत थोडा चिंतेत आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आता जानेवारीत श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-20 मालिकेत टीम इंडियात पुनरागमन करताना दिसणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी मालिका 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

IND vs BAN Rohit Sharma Ruled Out
Video : इतका आनंद झाला की, तिनं ब्रा... फायनलमध्ये रंगली तिचीच चर्चा

भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळल्या गेला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. भारताकडून या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनीही शतकी खेळी खेळली केली. टीम इंडियाच्या विजयासह भारताने या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com