
IND vs BAN: श्रेयस अय्यर नाही तर 'या' फ्लॉप खेळाडूला मिळाला प्लेयर ऑफ द सीरीजचा अवॉर्ड
India vs Bangladesh Shreyas Iyer : ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. या सामन्यात आर अश्विन आणि श्रेयस अय्यरच्या लढाऊ खेळीमुळे टीम इंडियाने बांगलादेशच्या तोंडातून विजय हिसकावून घेत हा सामना भारताच्या नावावर केला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूची निवड करणे सोपे नाही. कारण दोन्ही सामन्यांमध्ये प्रत्येकाने कामगिरी कशी केली हे पाहावे लागत, परंतु दोन्ही सामन्यांमध्ये एक खेळाडू होता ज्याने एकदा 80-80 धावा केल्या, पण त्या खेळाडूला प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब मिळाला नाही.
हेही वाचा: IND vs BAN 2nd Test : विराटने घातलेला गोंधळ अय्यर-अश्विनने सावरला; भारत हरता हरता जिंकला
दुसऱ्या कसोटी सामन्यात अपयशी ठरलेला भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला, ज्याने पहिल्या सामन्यात एका डावात 90 धावा आणि दुसऱ्या डावात शतक झळकावले. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला दोन्ही डावात केवळ 30 धावाच करता आल्या. असे असूनही चेतेश्वर पुजाराला प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब मिळाला. तर श्रेयस अय्यर यापासून वंचित राहिला.
हेही वाचा: WTC Points Table: भारताची चार टक्केने वाढ, आफ्रिका अन् श्रीलंकेला फुटला घाम, जाणून घ्या समीकरण
श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारा यांच्यातील मालिकेतील धावांचे अंतर अवघे 20 धावांचे आहे. पुजाराने 222 आणि अय्यरने 202 धावा केल्या. अय्यरने पहिल्या सामन्यात 86 आणि दुसऱ्या सामन्यात 87 धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्याच्या शेवटच्या डावात त्याने नाबाद 29 धावा केल्या आणि टीम इंडियाला एक सामना जिंकून दिला. जो भारताच्या हातातून निसटणार होता. असे असतानाही पुजाराला प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब पटकावण्यात यश आले.
हेही वाचा: IND vs BAN: 'आईशप्पथ लई टेन्शन आलेलं...' दुसऱ्या कसोटी विजयानंतर कर्णधार राहुलचे विधान
दुसरीकडे जर आपण दुसऱ्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूबद्दल बोललो तर हा पुरस्कार अश्विनने जिंकला, ज्याने सामन्यात एकूण 6 बळी घेतले आणि दोन्ही डावात एकूण 54 धावा केल्या. मात्र सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताला विजयासाठी त्याची नितांत गरज असताना त्याने नाबाद 42 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. अशा स्थितीत त्याच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्याने प्रत्येकजण आनंदी असेल.