IND vs ENG: पावसाने क्रिकेटरसिकांच्या आनंदावर फिरवलं पाणी!

IND vs ENG: पावसाने क्रिकेटरसिकांच्या आनंदावर फिरवलं पाणी! भारताला विजयासाठी १५७ धावा तर इंग्लंडला ९ बळींची गरज Ind vs Eng 1st Test Day 5 Live Updates Rain stopped Play Team India need 157 to win England wants 9 wickets vjb 91
Ind-vs-Eng-Rain
Ind-vs-Eng-Rain

Ind vs Eng 1st Test: भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने दुसऱ्या डावात केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे सामन्यात रंगत आली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर त्यांनी ३०३ धावांपर्यंत मजल मारली. भारताचा जसप्रीत बुमराह याने पाच बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजांना काहीसा अंकुश लावला पण तरीही भारताला विजयासाठी इंग्लंडने २०९ धावांचे लक्ष्य दिले. त्यातील ५२ धावा भारताने चौथ्या दिवशीच केल्या. त्यामुळे शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावा तर इंग्लंडला ९ बळींची गरज आहे. पाचव्या दिवसाचा खेळ रंगतदार असणार अशी साऱ्याच क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा होती. पण पावसाने चाहत्यांच्या आनंदाला मोठा फटका बसला.

पाचव्या दिवसाचा खेळ खेळण्यासाठी दोन्ही संघ पूर्ण जोशात मैदानात उतरतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी वन डे सारखा सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण पावसाने चाहत्यांच्या आनंदावर पाणी फेरले. इंग्लंडमध्ये त्यांच्या स्थानिक वेळेनुसार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. त्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ पूर्णपणे वाया गेला. त्यानंतर चहापानाच्या खेळापर्यंतही आजच्या दिवसाचा एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे क्रिकेटरसिकांचा हिरमोड झाला.

तत्पूर्वी, पहिल्या चार दिवसांच्या खेळात इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर तर भारताचा पहिला डाव २७८ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगला कमबॅक केला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याचे शतक (१०९), जॉनी बेअरस्टो (३०) आणि सॅम करन (३२) या तिघांनी संघाला त्रिशतकी मजल मारून दिली. त्यामुळे भारताला विजयासाठी २०९ धावांचे आव्हान मिळाले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताकडून पहिल्या डावात दमदार ८२ धावा करणारा राहुल स्वस्तात बाद झाला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी प्रत्येकी १२ धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com