साहेबांची दाणादाण उडवणाऱ्या पिचवर रोहित-राहुलची खास हॅटट्रिक

साहेबांची दाणादाण उडवणाऱ्या पिचवर रोहित-राहुलची खास हॅटट्रिक Ind vs Eng 1st Test: इंग्लंडच्या स्विंग गोलंदाजांचा घेतला खरपूस समाचार Ind vs Eng 1st Test Rohit Sharma KL Rahul gives half century partnership Hat trick of this feat vjb 91
KL-Rahul-Rohit-Sharma
KL-Rahul-Rohit-Sharma

Ind vs Eng 1st Test: इंग्लंडच्या स्विंग गोलंदाजांचा घेतला खरपूस समाचार

Ind vs Eng 1st Test: भारतीय वेगवान गोलंदाजांनी पहिल्या कसोटीत इंग्लंडचा डाव अवघ्या १८३ धावांमध्ये गुंडाळला. बुमराह, शमी, सिराज आणि शार्दूल यांच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. बुमराहने ४ बळी टिपत साहेबांच्या डावाला सुरूंग लावला. इंग्लंडचा डाव संपल्यानंतर भारतीय सलामीवीरांनी अतिशय सावध आणि संथ अशी खेळी केली. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या दोन्ही फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत एक विशेष अशी हॅटट्रिक साकारली.

KL-Rahul-Rohit-Sharma
भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं म्हणजे... -गंभीर

भारताचा नियमित कसोटी सलामीवीर शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल दोघेही जायबंदी असल्याने मालिकेबाहेर झाले. पृथ्वी शॉ ला इंग्लंडला बोलावण्यात आले पण त्याला क्वारंटाइन संपल्याशिवाय संघात स्थान देणे शक्य नव्हते. त्यामुळे लोकेश राहुलला संघात स्थान मिळाले आणि त्याने रोहित शर्मासोबत अर्धशतकी सलामी दिली. रोहित-राहुलने या दमदार सलामीही अनोखी हॅटट्रिक केली. या दोघांनी सलग तिसऱ्यांना अर्धशतकी भागीदारी करण्याचा पराक्रम केला.

KL-Rahul-Rohit-Sharma
Video: मराठमोळ्या शार्दूलने इंग्लंडच्या कर्णधाराला गुंडाळलं...

दरम्यान, त्याआधी टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला पहिल्यात षटकात धक्का बसला. बर्न्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर क्रॉली आणि सिबलीने अर्धशतकी भागीदारी केली. पण क्रॉली २७ धावांवर बाद झाला. त्यानंतर सिबलीदेखील १८ धावांवर माघारी परतला. बेअरस्टोने काही काळ रूटची साथ दिली पण तो २९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर झटपट गडी बाद होत गेले. सॅम करनने काही काळ झुंज दिली. पण त्याला दुसरीकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे संघाचा डाव १८३ धावांमध्ये आटोपला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com