IND vs ENG: रोहितचे अर्धशतक! पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

IND vs ENG: रोहितचे दमदार अर्धशतक! पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम ८३ चेंडूत ८ चौकारांसह ठोकलं अर्धशतक Ind vs Eng 2nd Test at Lords Rohit Sharma Hits first ever Fifty in England for Team India vjb 91
rohit sharma
rohit sharmaAFP
Updated on

८३ चेंडूत ८ चौकारांसह ठोकलं अर्धशतक

पहिली कसोटी अनिर्णितक राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारताने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि भारताने दमदार कामगिरी करून दाखवली. भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली आणि ८३ चेंडूत आपलं अर्धशतक ठोकले. याचसोबतच त्याने एक पराक्रम केला.

rohit sharma
IND vs ENG: कोहली भाऊ, तुमचं चाललंय काय? नेटकरी विराटवर भडकले

रोहित शर्माने डावाच्या सुरुवातीपासून खराब चेंडूवर फटकेबाजी करण्याचा पवित्रा घेतला होता. चांगला किंवा स्विंग येणारा चेंडू आला तर तो सोडून द्यायचा पण खराब चेंडू आला तर त्यावर नक्कीच चौकार खेचायचा अशी त्याची भूमिका होती. त्यामुळे रोहितला इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेता आला. पावसाचा व्यत्यय आला तरीही रोहितने चांगला खेळ सुरूच ठेवला आणि कसोटी क्रिकेटमधील आपले १३वे अर्धशतक झळकावले. महत्त्वाची बाब म्हणजे, इंग्लंडच्या भूमीवर अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम रोहितने पहिल्यांदजाच केला. रोहित गेल्या काही सामन्यात ३० पेक्षा जास्त धावा करत होता पण त्याला अर्धशतक ठोकणे शक्य होत नव्हते. या सामन्यात मात्र त्याने हा पराकर्म करून दाखवला.

rohit sharma
IND vs ENG: "म्हणूनच शक्य असूनही अश्विनला संघात घेतलं नाही"

रोहितने ८३ चेंडूत दमदार असे अर्धशतक झळकावले. भारत बिनबाद ४६ धावांवर असताना पावसामुळे उपहाराची विश्रांती वेळेच्या आधीच घ्यावी लागली. पण लंच ब्रेकनंतरही रोहितने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने ८ चौकारांसह अर्धशतक ठोकले. रोहितला लोकेश राहुलने चांगली साथ दिली. रोहित फटकेबाजी करत असताना राहुलने दुसऱ्या बाजूने अतिशय संयमी खेळी केली. रोहितचे अर्धशतक झाले त्यावेळी राहुल ६७ चेंडूत केवळ १५ धावा करून खेळत होता. राहुलच्या संयमी खेळीमुळेच रोहितला आक्रमक खेळता आले आणि इंग्लंडच्या भूमीवर पहिलेवहिले अर्धशतक लगावता आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com