Ind vs Eng 2nd Test Day 4 : बॅझबॉल का घमंड टूटा... अश्विन-बुमराह कहर; भारताचा 106 धावांनी विजय

India vs England 2nd Test Day 4 Live Scorecard Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील विशाखापट्टणम कसोटी सामना जिंकला, मालिकेत 1 - 1 अशी आघाडी घेतली.
Ind vs Eng 2nd Test Day 4 : बॅझबॉल का घमंड टूटा... अश्विन-बुमराह कहर; भारताचा 106 धावांनी विजय

Ind vs Eng 2nd Test Day 4 Scorecard Updates :

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने पहिली कसोटी 28 धावांनी जिंकली. तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळली जाणार आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वालने 209 धावांची खेळी (290 चेंडू, 19 चौकार आणि सात षटकार) खेळली. पहिल्या डावात यशस्वीशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 35 धावांचा आकडाही गाठता आला नाही. इंग्लंडकडून शोएब बशीर, जेम्स अँडरसन आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांत आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सहा खेळाडूंना आऊट केले. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 143 धावांची मोठी आघाडी मिळाली. यानंतर भारताने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. भारतासाठी दुसऱ्या डावात शुभमन गिलने 147 चेंडूंचा सामना करत 104 धावा केल्या. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने चार बळी घेतले.

शुभमन गिलच्या या खेळीमुळे विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य मिळाले. पण त्यानंतर भारताने इंग्लिश संघाला 292 धावांत गुंडाळून सामना जिंकला.

भारताकडून जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात 3 तर अश्विनने देखील 3 विकेट्स घेतल्या. तर मुकेश, कुलदीप आणि अक्षरने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून झॅक क्राऊलीने सर्वाधिक 73 धावा केल्या.

जसप्रीत बुमराहने संपवला सामना 

जसप्रीत बुमराहने टॉम हार्टलीचा त्रिफळा उडवत भारताला विजय मिळवून दिला.

मुकेश कुमारने अखेर उघडलं विकेटचं खातं 

मुकेश कुमारने शोएब बशीरला शुन्यावर बाद करत आपलं विकेटचं खांत उघलं.

Ind vs Eng 2nd Test Day 4 Live : अखेर जसप्रीत बुमराहने जोडी फोडली

आठव्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी रचणाऱ्या बेन फोक्स आणि टॉम हार्टलीची जोडी अखेर जसप्रीत बुमराहने फोडली. त्याने 36 धावा करणाऱ्या फोक्सला बाद केलं. आता भारताला विजयासाठी फक्त 2 विकेट्सची गरज आहे.

Ind vs Eng 2nd Test Day 4 Live : बेन फोक्स-टॉम हार्टलीची अर्धशतकी भागीदारी; शेपूट ठरतेय डोकेदुखी

बेन स्टोक्स बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव लगेच संपुष्टात येईल असं वाटलं होतं. मात्र बेन फोक्स आणि टॉम हार्टलीने आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत भारताला टेन्शन दिलं आहे. इंग्लंडच्या 7 बाद 275 धावा झाल्या असून त्यांना विजयासाठी 124 धावांची गरज आहे.

Ind vs Eng 2nd Test Day 4 Live : ब्रेकनंतर इंग्लंडला मोठा धक्का! श्रेयसच्या 'त्या' थ्रोवर कर्णधार स्टोक्स आऊट

इंग्लंडला 220 धावांवर सातवा धक्का बसला. श्रेयस अय्यरच्या थ्रोवर कर्णधार बेन स्टोक्स धावचीत झाला. त्याला 11 धावा करता आल्या. भारत विजयापासून फक्त तीन विकेट दूर आहे.

Ind vs Eng 2nd Test Day 4 Live : लंच ब्रेकपर्यंत मोठी उलथापालथ! इंग्लंडला बसले 6 धक्के, भारत विजयापासून चार पावले दूर

इंग्लंडने 194 धावांवर सहा विकेट गमावल्या आहेत. सहावी विकेट पडताच अंपायरने लंचची घोषणा केली. इंग्लिश संघाला विजयासाठी अजून 205 धावांची गरज आहे. भारतीय संघाने या सामन्यात आपली पकड मजबूत केली आहे. मात्र, बेन स्टोक्स आणि बेन फॉक्स अजूनही क्रीजवर आहेत.

Ind vs Eng 2nd Test Day 4 Live : आर अश्विनचा तांडव...! पोप पाठोपाठ रुटला पाठवले पॅव्हेलियन; इंग्लंडला 154 धावांवर चौथा धक्का

चौथ्या दिवशी इंग्लंडला 154 धावांवर चौथा धक्का बसला. आर अश्विनने ऑली पोपपाठोपाठ जो रूटला पॅव्हेलियन पाठवले. पोपला 23 धावा करता आल्या. तर रूटने 10 चेंडूत दोन चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 16 धावांची खेळी केली.

Ind vs Eng 2nd Test Day 4 Live : फायनली...! अक्षर पटेलने इंग्लंडला दिला दुसरा धक्का

399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची दुसरी विकेट 95 धावांवर पडली आहे. यावेळी अक्षर पटेलने रेहान अहमदला बाद केले.

Ind vs Eng 2nd Test Day 4 Live : चौथ्या दिवसाचा खेळ सुरू  

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. इंग्लंडने एका विकेटवर 80 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारताने 399 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या जॅक क्रॉली आणि रेहान अहमद क्रीजवर आहेत.

Ind vs Eng 2nd Test Day 4 Live : विजयासाठी हव्या ९ विकेट ; गिलच्या शतकामुळे भारताला विजयाची आशा

इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेरीस 1 बाद 67 धावा केल्या आहेत, पण त्यांना अजुन 332 धावांची आवश्‍यकता आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला इंग्लंडच्या नऊ विकेट मिळवण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com