INDVvsENG अश्विनच्या मिम्सवर पत्नी झाली फिदा; ट्विट होतंय व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 16 February 2021

'मॅन ऑफ द मॅच'चा मानकरी ठरलेल्या अष्टपैलू खेळाडूची पत्नी प्रिथी अश्विन (Prithi Ashwin) हिने एक मिम्स सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

India Vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या पराभवाच हिशोब चुकता करत मालिकेत बरोबरी साधली. भारतीय संघाच्या विजयात रविद्रन अश्विनन याने अष्टपैलू कामगिरीनं मोलाचा वाटा उचलला. अश्विनने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 3 विकेटसह एकूण आठ विकेट घेतल्या. एवढेच नाही तर खेळपट्टीवर टिका होत असताना अश्विनने शतकी खेळी साकारली.  

सामन्यातील हिरो ठरलेल्या अश्विनची पत्नी सोशल मीडियावरुन जोरदार बॅटिंग करताना दिसतेय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेल्या अष्टपैलू खेळाडूची पत्नी प्रिती अश्विन (Prithi Ashwin) हिने एक मिम्स सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तिचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होताना दिसते.   दुसऱ्या कसोटी सामन्यात घरच्या मैदानावर शतकी खेळी केल्यानंतर अश्विन ट्विटरवर ट्रेंडिगमध्ये आहे. अनेकजन वेगवेगळ्या मिम्सच्या माध्यमातून अश्विनच्या खेळीच कौतुक होत असताना प्रितीनं एक खास मिम्सचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलाय. या फोटोत मास्टर चित्रपटाचे पोस्टर पाहायला मिळते. या चित्रपटातील अभिनेता विजयच्या जागी अश्विनचे चित्र पोस्टरमध्ये दिसून येते. व्हायरल होणारा हा फोटो कोणी केलाय? असा प्रश्न विचारत प्रितीने या पोस्टरला दाद दिली आहे.  

Ind vs Eng : चेन्नईत टीम इंडियाचा लुंगी डान्स; मालिका बरोबरीसह ICC वर्ल्ड टेस्ट रॅंकिगमध्ये सुधारणा

चेन्नईच्या चेपॉक खेळपट्टीवर माजी क्रिकेटर्स टीका करत असताना रविचंद्रन अश्विनने शतकी खेळी करुन टीकाकारांची तोंड बंद केली होती.  पहिल्याच डावात अश्विनने आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवले. चेन्नई मधील चेपॉकच्या ज्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ, इंग्लंडच्या मायकेल वॉगन यांनी टीका केली होती, आज त्याच विकेटवर अश्विनने शतक करुन दाखवले. 

INDvsENG: शतकी पंचसह घरच्या मैदानावर अश्विननं केली 'हवा'; कळलं का भावा!

या मैदानावर फलंदाजी करणे कठीण मानल्या जाते. अश्विनचे ​​चाहते अश्विनच्या या शतकाचे ट्विटरवर खूप कौतूक करत आहेत. चेपॉकच्या या खेळपट्टीवर अश्विनला ​​हे शतक करणे इतके सोपे नव्हते. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. यापूर्वी आर अश्विनच्या अर्धशतकानंतर त्याची पत्नी प्रिती अश्विन सुद्धा स्वत:ला ट्विट करण्यापासून रोखू शकली नाही. तिने गंमतीशीर टि्वट करून चेपॉकच्या खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांवर चांगलाच टोला हाणला होता. ‘माझा नवरा प्रत्येकाला ट्रोल करतोय #win50’ असे कॅप्शनसह प्रितीने तिसऱ्या दिवशी ट्विट केले होते, याचीही चांगलीच चर्चा रंगली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ind vs eng 2nd test ravichandran ashwins wife prithi share funny meme photo viral