Ind vs Eng : सरफराज खान नाही तर 'हा' स्टार तिसऱ्या कसोटीत करणार पदार्पण, 30 वर्षीय खेळाडूचा पत्ता कट?

Dhruv Jurel likely to replace KS Bharat : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळला जाणार आहे....
India vs England 3rd Test Dhruv Jurel likely to replace KS Bharat in Rajkot Marathi News
India vs England 3rd Test Dhruv Jurel likely to replace KS Bharat in Rajkot Marathi Newssakal

India vs England 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळला जाणार आहे. यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा राजकोटला पोहोचला आहे. इंग्लंडचा संघही तिसऱ्या कसोटीसाठी मंगळवारी राजकोटला पोहोचणार आहे. भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल तिसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करू शकतो. ज्युरेलचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

India vs England 3rd Test Dhruv Jurel likely to replace KS Bharat in Rajkot Marathi News
AUS vs WI : ग्लेन मॅक्सवेलचा शतकी झंझावात; ऑस्ट्रेलियाचा ‘टी-२०’ मालिका विजय; वेस्ट इंडीजवर ३४ धावांनी मात

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये केएस भरतला यष्टिरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती, जिथे तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. अशा स्थितीत तिसऱ्या कसोटीत त्याला प्लेइंग इलेव्हनमधून त्याचा पत्ता कट होऊ शकतो. 30 वर्षीय भरतच्या जागी यूपीचा नवोदित यष्टीरक्षक जुरेलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

India vs England 3rd Test Dhruv Jurel likely to replace KS Bharat in Rajkot Marathi News
U19 World Cup : 397 धावा... पण भारतीय कर्णधाराला मिळाला नाही 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' अवॉर्ड, नक्की दिला तरी कोणाला?

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केएस भरतला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी युवा ध्रुव जुरेलला संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही तो टीम इंडियामध्ये यष्टिरक्षकाची भूमिका बजावत होता, तर इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद आणि विशाखापट्टणम कसोटी सामन्यातही त्याला संधी देण्यात आली होती. पण त्याने शेवटच्या 12 कसोटी डावात 20.09 सरासरी 221 धावा केल्या.

India vs England 3rd Test Dhruv Jurel likely to replace KS Bharat in Rajkot Marathi News
Ranji Trophy : पराभव टाळण्यासाठी महाराष्ट्राची झुंज; विदर्भाला डावाने विजयाची आशा

बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'केएस भरतची फलंदाजी अलीकडे खूपच खराब राहिली आहे. आणि यासोबत त्याची विकेटकीपिंगही चांगली नव्हती. त्याला मिळालेल्या संधीचा फायदा उठवता येत नाही. दुसरीकडे, जुरेल हा एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने उत्तर प्रदेश, भारत अ आणि राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. ध्रुव जुरेलने राजकोटमध्ये कसोटी पदार्पण केल्यास आश्चर्य वाटायला नको. केएस भरतने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मिळालेली सुवर्णसंधी गमावली. त्याने चार डावात 23 च्या सरासरीने केवळ 92 धावा केल्या.

ध्रुव जुरेलने 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 46.47 च्या सरासरीने 790 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 249 धावा आहे. 22 वर्षीय जुरेलने गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये इंग्लंड लायन्सविरुद्ध 50 धावा केल्या होत्या, आणि डिसेंबरमध्ये बेनोनी येथे दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात 69 धावा केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com