esakal | Video: अजिंक्य रहाणेचा मोईन अलीने घेतलेला भन्नाट झेल पाहिलात?
sakal

बोलून बातमी शोधा

Moeen-Ali-Ajinkya-Rahane

Video: अजिंक्य रहाणेचा मोईन अलीने घेतलेला भन्नाट झेल पाहिलात?

sakal_logo
By
विराज भागवत

Ind vs Eng: चेंडू जमिनीच्या दिशेने जात असतानाच अलीने झेप घेतली अन्...

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याचा खराब फॉर्म चौथ्या कसोटीतही कायम राहिला. भारतीय संघाच्या पहिल्या डावाची खराब सुरूवात झाल्यानंतर अजिंक्य रहाणेकडून भारताला खूप अपेक्षा होत्या, त्याने पुन्हा एकदा साऱ्यांची निराशाच केली. क्रेग ओव्हरटनच्या आऊटस्विंगर गोलंदाजीवर अजिंक्यने आपली विकेट बहाल केली. पण रहाणेच्या विकेटमध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती मोईन अलीने टिपलेल्या कॅचची...

हेही वाचा: IND vs ENG: विराटचं करायचं तरी काय? रूटने कॅच सोडला तरीही...

अजिंक्य रहाणेला डावाच्या सुरूवातीला अंपायरने पायचीत बाद दिले होते. पण त्यावेळी अजिंक्यला DRSमध्ये जीवदान मिळाले. या जीवदानाचा अजिंक्य किती उपयोग करतो याकडे साऱ्यांचेच लक्ष होते, पण अजिंक्यने चाहत्यांनी पार निराशा केली. ओव्हरटनच्या बाहेर जाणाऱ्या एका चेंडूला त्याने बॅट लावली. चेंडू वेगाने हवेत गेला पण तो जमिनिच्या दिशेने जात असतानाच तिसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या मोईन अलीने झेप घेतली आणि तो कॅच टिपला. त्यामुळे सुरूवातील जीवदान मिळालेला अजिंक्य रहाणे ४७ चेंडूत १४ धावा काढून माघारी परतला.

हेही वाचा: Video: रोहित शर्मा फलंदाजी करताना अचानक चेंडू उसळला अन्...

विराटलाही मिळालं होतं जीवदान पण...

भारताने झटपट चार गडी गमावल्यानंतर कर्णधार कोहली आणि उपकर्णधार रहाणे यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. २२ धावांवर असताना कोहलीच्या बॅटला कट लागून चेंडू जो रूटकडे गेला होता, पण त्याला तो झेल टिपता आला नाही. जीवनदान मिळाल्यानंतर कोहली मोठी खेळी करेल असं वाटत होतं. त्यानुसार, त्याने अर्धशतक झळकावलं. पणअर्धशतक साजरं करताच तो ओली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. या मालिकेत रॉबिन्सनने कोहलीला तिसऱ्यांदा बाद केले. कोहलीने ९६ चेंडूत ८ चौकारांसह ५० धावा केल्या.

loading image
go to top