esakal | IND vs ENG: "टीम इंडिया काय करते याकडे आम्ही जराही लक्ष देत नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

England-Cricket

"टीम इंडिया काय करते याकडे आम्ही जराही लक्ष देत नाही"

sakal_logo
By
विराज भागवत

इंग्लंडच्या सहाय्यक प्रशिक्षकाने सांगितला भारताला हरवण्याचा 'मास्टरप्लॅन'

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या कसोटी मालिकेत (Ind vs Eng Test Series) चांगल्या लयीत (Out of Form) नाहीये. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत विराटची बॅट फारशी तळपली नसली तरी भारताने (Team India) चांगली कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात (3rd Test) मात्र विराटसेना पराभूत झाली. टीम इंडियाला १ डाव आणि ७६ धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर अनेक खेळाडूंनी विविध मते व्यक्त केली. इंग्लंड क्रिकेट संघाचा सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या पॉल कॉलिंगवूड (Paul Collinwood) याने भारतीय संघाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केले.

हेही वाचा: "आक्रमकपणा विराटला भोवतोय, त्याची सत्ता गाजवण्याची सवय..."

"लॉर्ड्सवर झालेला कसोटी सामना खूपच अटीतटीचा आणि राड्याने युक्त असा होता. दोन्ही संघ आपलं सर्वस्व पणाला लावून खेळले. जेव्हा दोन्ही संघांसाठी विजय हा खूप महत्त्वाचा असतो त्यावेळी प्रत्येक खेळाडू प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्याचा विचार करत असतो. त्यात काही वेळा बाचाबाची आणि वाद होतात, ते पाहायला रंजक वाटतात. लॉर्ड्सच्या मैदानावर आम्ही पराभूत झालो, पण दोन्ही संघांनी 'काँटे की टक्कर' दिली. ऑस्ट्रेलियन संघाचा क्रिकेट खेळण्याचा स्वभाव आणि पद्धत काळानुरूप बदलत गेलं. त्यामुळे भारत कितीही आक्रमक खेळत असेल तरी त्या संघाला 'ऑस्ट्रेलियासारखं खेळत आहे' असं म्हणणं योग्य नाही", असे स्पष्ट मत इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड याने व्यक्त केले.

हेही वाचा: विराट फक्त 'त्या' प्रकारच्या पिचवरच चांगलं खेळू शकतो- अँडरसन

Virat Kohli

Virat Kohli

विराट हा एक अतिशय प्रतिभावान आणि आक्रमक कर्णधार आहे. तो आपल्या संघाला त्याच्यासोबत पुढे नेत वाटचाल करतो. आम्ही मात्र सध्या एक संघ म्हणून कसा खेळ करता येईल यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. भारतीय संघ काय निर्णय घेतो किंवा ते काय करतात याकडे आम्ही लक्ष देत नाहीत. आम्ही यावर लक्ष केंद्रीत करतोय की आमचे असे कोणते निर्णय असतील जे भारतावरचा दबाव वाढवतील. भारताने काय निर्णय घ्यायचे, कसे प्लॅन आखायचे हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मैदानावर कशा पद्धतीने निर्णय घेतो हे आमच्या खेळाडूंसाठी महत्त्वाचे आहे. त्याचा सामन्याच्या निकालावर परिणाम होतो", असे पॉल कॉलिंगवूडने सांगितले.

loading image
go to top