
Ind vs Eng Day 1 @ Lords: दिवसअखेर भारताचे २५० पार मजल
Ind vs Eng Day 1: भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर ३ गड्यांच्या मोबदल्यात २७६ धावांपर्यंत मजल मारली. लोकेश राहुलचे धडाकेबाज शतक आणि रोहित शर्माच्या दमदार ८३ धावांच्या बळावर भारताने ही मजल मारली. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेला भारतीय कर्णधार विराट कोहली याला आज चांगली सुरूवात मिळाली पण अर्धशतकानजीक असताना तो बाद झाला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत लोकेश राहुल (नाबाद १२७) आणि अजिंक्य रहाणे (नाबाद १) यांनी खेळपट्टी सांभाळली. अँडरसनला दोन तर रॉबिन्सनला एक गडी बाद करता आला.
टॉस हारल्यानंतर भारताचा संघ फलंदाजीसाठी आला. रोहित शर्माने आपला आक्रमक खेळ सुरू करत इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. रोहितने ८३ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यात ८ चौकारांचा समावेश होता. त्यानंतरही तो फटकेबाजी करतच होता. अखेर जेम्स अँडरससने त्याच्या डावाला ब्रेक लावला. ८३ धावांवर असताना रोहित क्लीन बोल्ड झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. रोहितने ११ चौकार आणि १ षटकार लगावला.
रोहित बाद झाल्यावर आलेला चेतेश्वर पुजारा अतिशय संथ खेळत होता. त्यामुळे राहुलने आपल्या फलंदाजीचा वेग वाढवला. झटपट धावा करत त्याने अर्धशतक साजरे केले. १४० चेंडू खेळत त्याने अर्धशतकी धावसंख्या गाठली. पुजाराला चांगली सुरूवात मिळूच शकली नाही. २३ चेंडूत त्याने ९ धावा केल्या पण त्यालाही अँडरसनने माघारी पाठवले. मग दिवस संपेपर्यंत राहुल आणि विराट खिंड लढवतील असे वाटत असतानाच विराट ४२ धावांवर बाद झाला. ओली रॉबिन्सनने त्याला अर्धशतकाआधीच माघारी धाडले.
राहुलने मात्र आपली खेळी सुरू ठेवत धडाकेबाज शतक ठोकले. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत राहुल आणि अजिंक्य रहाणे खेळपट्टीवर टिकून राहिले. अखेर ३ बाद २७६ धावांवर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.