IND vs ENG: इंग्लंडने चेंडूसोबत केली छेडछाड? फोटो व्हायरल

खेळाडूंच्या बुटाला spikes असतात. त्याच्या माध्यमातून चेंडूशी छेडछाड होऊ शकते.
IND vs ENG
IND vs ENGTwitter

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाउन कसोटीत क्रिकेटला काळीमा फासणारी घटना अजूनही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात असेल. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन कॅमरून बॅनक्रॉफ्ट (Cameron Bancroft), डेविड वॉर्नर आणि स्मिथ या त्रिकूटाला बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. यावेळी बॅनक्रॉफ्ट सँडपेपरच्या माध्यमातून चेंडूशी छेडछाडी करतानाचे काही फोटो समोर आले होते. आणि त्यानंतर क्रिकेटच्या मैदानातील मोठा कांडसमोर आला होता.

या गोष्टीची आठवण करुन देण्याचे कारण म्हणजे इंग्लंड आणि भारत यांच्यात क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेल्या सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार घडल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. क्रिकेटचा ऐतिहासिक वारसा असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानातील काही फोटो समोर येत असून चौथ्या दिवशीच्या खेळात इंग्लंडच्या खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार घडल्याची चर्चा सोशळ मीडियावर रंगली आहे.

IND vs ENG
IND vs ENG: जोडी जबरदस्त! पुजारा-रहाणेने केली विक्रमी कामगिरी

इंग्लंडच्या खेळाडूंकडून बॉल टेम्परिंग?

खेळाडूंच्या बुटाला spikes असतात. त्याच्या माध्यमातून चेंडूशी छेडछाड होऊ शकते. तिसऱ्या दिवसापासून इंग्लंडमधील वातावरणात चांगलाच बदल झाला असून खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल दिसली. तिसऱ्या दिवशी रुटला याचा फायदाही झाला. भारतीय गोलंदाज त्याला रोखण्यात अपयशी ठरले. लॉर्ड्सच्या मैदानात चौथ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावाला सुरुवात केली. आघाडी कोलमडल्यानंतर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने संघाचा डाव सावरलाय.

IND vs ENG
Video: रोहित शर्माचं करायचं तरी काय... आता परत केली तीच चूक!

दरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते. या फोटोमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी चेंडू बुटाखाली घेतल्याचे पाहायला मिळते. यावरुन नेटकरी इंग्लंडचे खेळाडू बॉल टेम्परिंगचा प्रकार करत असल्याचा आरोप करत आहेत. यासंदर्भात अधिकृतरित्या कोणतीही गोष्ट समोर आलेली नाही. भारतीय संघाकडूनही अद्याप असा कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही.

स्टीव स्मिथ आणि डेविड वार्नरने भोगलीये मोठी शिक्षा

केपटाउन कसोटीतील बॉल टेम्परिंग प्रकरणात कॅमरन बेनक्रॉफ्टने चेंडूसोबत केलेली छेडछाड कॅमेऱ्यात कैद झाली होती. याप्रकरणात ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उप-कर्णधार डेविड वॉर्नर यांना दोषी ठरवण्यात आले होते. बेनक्रॉफ्टला 9 महिन्यांची तर स्मिथ आणि वॉर्न यांना एका वर्षांच्या बंदीस सामोरे जावे लागले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com