
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे खेळला जाईल. ख्रिस वोक्स इंग्लंड संघात परतला आहे. तसेच गोलंदाजी अष्टपैलू ब्रायडन कार्सेलाही संधी मिळाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना शुक्रवार, २० जूनपासून खेळला जाणार आहे.