
England vs India, 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज असलेल्या जसप्रित बुमराहला एकही विकेट मिळवता आली नाही. भारतीय संघाचा पहिला डाव 364 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 391 धावांसह 27 धावांची आघाडी घेतलीये. एका बाजूला युवा मोहम्मद सिराजने प्रभावित केले असताना दुसऱ्या बाजूने बुमराह सपशेल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय एका ओव्हरमधील 4 नो बॉलसह बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात 13 नॉ बॉल टाकल्याचे पाहायला मिळाले. नो बॉलमुळे सोशल मीडियावर बुमराहला ट्रोल करण्यात येत आहे. प्रमुख गोलंदाजाकडून झालेल्या या कामगिरीमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय.
इंग्लंडच्या संघाने जी अल्प आघाडी घेतलीये त्यात भारतीय संघातील गोलंदाजांनी नो बॉलच्या रुपात 17 अवांतर धावा दिल्यात. यात एकट्या बुमराहने 13 चेंडू नो बॉल टाकलेत. बुमराहने 26 षटकात 79 धावा खर्च करताना सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा नकोसा विक्रम आपल्या नावे केलाय.
इंग्लंड विरुद्धच्या डावात सातत्याने दोन षटकात त्याने तीन चेंडू नो बॉल फेकल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या डावातील 126 व्या षटकात अँडरसनला त्याने टाकलेल्या 10 चेंडूचे षटक टाकल्याचे पाहायला मिळाले. यातील चार चेंडू नो बॉल होते. यात त्याने बॅटने एकही धाव दिली नसली तरी अवांतर स्वरुपात इंग्लंडला 4 धावा मिळाल्या. बुमराहने या षटकासाठी जवळपा 15 मिनिटांचा कालावधी घेतला. यावरुन सोशल मीडियावर बुमराहला ट्रोल करण्यात येत आहे. अजिंक्य रहाणे, पुजारासह शमी आणि सिराज या चौघांनी मिळून जेवढ्या धावा केल्या नाहीत तेवढे नो बॉल बुमराहने फेकले, अशा आशयाची प्रतिक्रिया एकाने सोशल मीडियावरुन दिल्याचे पाहायला मिळते. नो बॉलमुळे सोशल मीडियावर ट्रोल होण्याची बुमराहची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील तो याच कारणावरुन ट्रोल झाला आहे. 2017 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये बुमराहचा नो बॉल टीम इंडियाला चांगलाच महागात पडला होता. आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सकडून खेळताना नो बॉलमुळे तो चर्चेत आला होता.
तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजीत धार पाहायला मिळाली. मोहम्मद सिरा 2 विकेटसह भारतीय संघाने इंग्लंडचा पहिला डाव 391 धावांत आटोपला. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट 180 धावा करुन शेवटपर्यंत नाबाद राहिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.