esakal | Video: 'लॉर्ड शार्दूल'चा जयजयकार... जो रूटची केली दांडी गुल!
sakal

बोलून बातमी शोधा

Lord-Shardul-Thakur

Video: 'लॉर्ड शार्दूल'चा जयजयकार... जो रूटची केली दांडी गुल!

sakal_logo
By
विराज भागवत

#LordShardul: नेटकऱ्यांकडून शार्दूल ठाकूरवर कौतुकाचा वर्षाव

Ind vs Eng 4th Test: इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमानांना धूळ चारली. भारताने १५७ धावांनी सामना जिंकत मालिकेत २-१ची अजिंक्य आघाडी घेतली. भारताकडून रोहित शर्माने दमदार शतक ठोकले. पण शार्दूलचा नेटकऱ्यांनी जयजयकार केला. दोन्ही डावात शार्दूलने दमदार अर्धशतके ठोकली. त्याचोसोबत दुसऱ्या डावात अतिमहत्त्वाची अशी कर्णधार जो रूटची दांडी गुल करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे लॉर्ड शार्दूल या नावाचा हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंड करत नेटकऱ्यांनी शार्दूल ठाकूरचा जयजयकार केला.

जो रूटची दांडी गुल (VIDEO)-

शार्दूल ठाकूरने दोन्ही डावात भारतीय फलंदाजीला दिशा दिली. ७ बाद १२७ वर भारतीय संघ असताना त्याने पहिल्या डावात ३६ चेंडूत ५७ धावा कुटल्या. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने १९१ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने ६० धावांची खेळी केली. तसेच, सामन्यात दोन्ही डावात मिळून त्याने ३ महत्त्वपूर्ण बळी टिपले. पहिल्या डावात त्याने सर्वाधिक ८१ धावांची खेळी करणाऱ्या ओली पोपला बाद केले. तर दुसऱ्या डावात शतकी सलामी तोडण्यासाठी शार्दूलचा उपयोग झाला. तसेच, सर्वोत्तम लयीत असलेल्या जो रूटलाही शार्दूलने बाद केले.

दरम्यान, भारताने इंग्लंडला ३६८ धावांचे मोठं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद या दोघांनी शतकी भागीदारी केली. पण पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडने दोन गडी गमावले. बर्न्स (५०) आणि मलान (५) बाद झाले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात इंग्लंडने झटपट ६ गडी गमावले. २ बाद १३१ या धावसंख्येवर इंग्लंड दुसरे सत्र खेळण्यास उतरले. कर्णधार जो रूट संयमी खेळ करत होता. पण अर्धशतकवीर हसीब हमीद मात्र चकला. जाडेजाने त्याला ६३ धावांवर त्रिफळाचीत केला.

हेही वाचा: Video: भन्नाट स्पिन! चेंडू स्टंपच्या बाहेरून आत वळला अन्...

त्यानंतर, जसप्रीत बुमराहने ओली पोप (२) आणि जॉनी बेअरस्टो (०) दोघांना लगेच त्रिफळा उडवत माघारी धाडले. पाठोपाठ मोईन अलीला शून्यावर जाडेजाने तंबूत पाठवले. जो रूट शांत व संयमी खेळ करत होता. पण बाहेरचा चेंडू मारताना बॅटची कड लागून तोदेखील त्रिफळाचीत झाला. रूटने ३६ धावा केल्या. त्यानंतर उमेश यादवने क्रेग ओव्हरटनला आपल्या जाळ्यात अडकवून झेलबाद केले. तिसऱ्या सत्रामध्ये क्रेग ओव्हरटन (१०) आणि जेम्स अँडरसन (२) या दोघांना लवकर बाद करून भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.

loading image
go to top