esakal | IND vs ENG: सामना रद्द झाल्यावर शास्त्री गुरुजी ट्रोल; शिक्षेची होतेय मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

ravi shastri

IND vs ENG: सामना रद्द झाल्यावर शास्त्री गुरुजी ट्रोल; शिक्षेची होतेय मागणी

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील मँचेस्टरच्या मैदानात नियोजित सामना कोरोना प्रसार वाढण्याच्या भितीनं स्थगित करण्यात आला. सामना पुन्हा खेळवण्यासाठी बीसीसीआय आणि ईसीबी विचार करत असून पुढच्या कँलेंडर इयरमध्येच याचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. सामना रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना ट्रोल करण्यात येत आहे.

चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. या दोघांशिवाय संघातील काही खेळाडूही यावेळी उपस्थितीत होते. बीसीसीआयची कोणतीही परवानगी न घेता हा कार्यक्रम पार पडला होता. यावर बीसीसीआयनेही नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रवी शास्त्रींवर कारवाई करा, त्यांच्यामुळेच भारतीय ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर उमटत आहेत.

हेही वाचा: IND vs ENG: शेवटची कसोटी रद्द झाल्यावर BCCI ची ECB ला नवी ऑफर

या कार्यक्रमानंतर ओव्हल कसोटी सामन्यावेळी रवी शास्त्रींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कातील अन्य सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली. हा सर्व प्रकार पुस्तक प्रकाशनातील कार्यक्रमामुळेच घडला, अशी चर्चा रंगत आहे.

हेही वाचा: IND vs ENG: "त्यांना नावं ठेवण्याआधी तुम्ही काय केलंत ते आठवा"

अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय ताफ्यातील आणखी एका स्टाफ सदस्याला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संघातील सर्व खेळाडूंची पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात आली. सर्व खेळाडूंचे रिपोर्टही निगेटिव्ह होते. इंग्लंडचा संघ सामना खेळण्यासाठी तयार होता.

मात्र भारतीय खेळाडूंची खेळण्याची मानसिकता नव्हती. बीसीसीआय आणि ईसीबीने एकत्रित चर्चा करुन शेवटी सामना स्थगित झाल्याची घोषणा केली. भारतीय संघाने माघार घेतल्यामुळे इंग्लंड विजेता ठरेल, अशी भितीही व्यक्त करण्यात येत होती. मात्र बीसीसीआयने दबाव टाकत इंग्लंडचा हा इरादा उधळून लावला आहे. सामना पुन्हा खेळवण्यासंदर्भात दोन्ही क्रिकेट मंडळामध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे.

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. नॉंटिंघममधील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर लॉर्डच्या मैदानातील सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. इंग्लंडने लीड्सचे मैदान मारत मालिकेत पुन्हा बरोबरी साधली. त्यानंतर भारतीय संघाने ओव्हलच्या मैदानात अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकत पुन्हा 2-1 अशी आघाडी घेतली. पाचवा सामना कधी होणार हे अद्याप निश्चित नाही. सध्याच्या घडीला भारतीय संघाकडे आघाडी कायम आहे.

loading image
go to top